यवतमाळ : यवतमाळमध्ये धक्कादायक प्रकार घडला. दारू न मिळाल्याने सॅनिटायझर प्यायल्याने 6 जणांचा मृत्यू झाला आहे. तीन जणांचा घरी मृत्यू झाला तर तिघांचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. दत्ता लांजेवार, नूतन पाथरटकर, गणेश नांदेकर, संतोष मेहर, सुनील ढेंगळे, गणेश शेलार अशी मृतांची नावे आहेत.
नितीन गडकरींनी केलेल्या आवाहनाला आंध्र प्रदेश महाराष्ट्राच्या मदतीला धावला https://t.co/ExkEe8W4B3
— Surajya Digital (@SurajyaDigital) April 24, 2021
महाराष्ट्रात कोरोना व्हायरस ला रोखण्यासाठी लॉकडाऊन लावण्यात आला आहे. त्यामुळे राज्यात फक्त अत्यावश्यक गोष्टींसाठीच परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे लॉकडाऊनच्या नियमानुसार राज्याती सर्व दारूची दुकाने बंद आहेत. त्यामुळे मोठा अनर्थ यवतमाळ जिल्ह्यात घडला आहे. दारू न मिळाल्याने नागरिकांनी दारू ऐवजी सॅनीटायजरचे सेवन केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
पानिपतहून सिरसा येथे जाणारा ऑक्सिजन टँकर बेपत्ता https://t.co/vUOJQ5q5hO
— Surajya Digital (@SurajyaDigital) April 24, 2021
यात सॅनिटायजर पिलेल्या 6 लोकांचा जीव केला असून काही जणांची प्रकृती गंभीर असल्याचे समजते. राज्य सरकारकडून या घटनेची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. ही घटना यवतमाळमधील वणी या शहरात घडलेली आहे. वणी शहरातील काही नागरिकांनी दारू न भेटल्यामुळे सॅनीटायझरचे व्यसन केले. काही वेळाने त्यांची प्रकृती खराब झाल्याने त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं.
'आमचे आमदार वारले,' मतदारसंघात न फिरकल्याने पोस्ट व्हायरल https://t.co/I9EzCDj0pY
— Surajya Digital (@SurajyaDigital) April 24, 2021
उपचारादरम्यानच 6 लोकांचा मृत्य झाला असून हे लोक गवंडी कामगार असल्याचं समोर आलंय. यवतमाळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 6 लोकांचा मृत्यू झाला असून सर्व मृत व्यक्ती हे गवंडी कामगार होते. दारू न मिळाल्याने या कामगारांनी सॅनीटायझरचे सेवन केल्याचं त्यांनी म्हटलं आहे.