वेळापूर : तांदुळवाडीत (ता. माळशिरस) ग्रामपंचायत यांच्या वतीने लोकसहभागातून हनुमान विद्यालय इमारतीमध्ये कोवीड केअर सेंटरचा शुभारंभ आज शनिवारी तहसीलदार जगदीश निंबाळकर यांच्या हस्ते झाला. राज्यात बहुतांशी हा पहिलाच प्रयोग आहे. यात 25 बेडची सोय केली असून औषधोपचार पूर्णपणे मोफत राहणार आहे.
पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांना काळे झेंडे दाखवून निषेध, केले हे आरोप https://t.co/aNPkyqDBrr
— Surajya Digital (@SurajyaDigital) April 24, 2021
यावेळी बोलताना ॲड. नागेश काकडे म्हणाले, की कोरोनाची दुसरी लाट ही खूप मोठी आहे. हॉस्पिटलमध्ये बेड मिळत नाहीत, ऑक्सिजनचा मोठ्या प्रमाणात तुटवडा आहे. रेमडेसिव्हिर इंजेक्शन मिळत नाही. त्यामुळे कृपया येत्या काही दिवसात आपण खूप सतर्क राहिले पाहिजे. माझा वैयक्तिक असा अनुभव आहे की, जे लोक मनाची समजूत घालून आजार अंगावर काढतात, त्यांना पुढे जाऊन ऑक्सिजन, व्हेंटिलेटर, लागतो व ते रुग्ण सिरीयस होतात.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
ज्या रुग्णांना कमी लक्षणे किंवा अतिसौम्य लक्षणे असतील तर त्यांना, तांदुळवाडी येथे कोविड केअर सेंटर सुरु झाले आहे. कोणीही घरी राहून किंवा बाहेर फिरून गावात संख्या वाढवू नका. तांदुळवाडी परिसरात सध्या २७ पॉझिटिव्ह रुग्ण आहेत ही संख्या वाढू नये यासाठी तांदळवाडी ग्रामपंचायत काळजी घेत असून कोरोनाची लाट गावातच थांबवण्याचा कोवीड केअर सेंटरच्या माध्यमातून आमचा प्रयत्न राहणार असल्याचे शेवटी नागेश काकडे यांनी सांगितले.
यावेळी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रकाश पाटील, पिलीव आरोग्य केंद्राचे डॉ. माने देशमुख, डॉ. राहुल मिले, डॉ. विजय निलटे, तांदुळवाडी ग्रामपंचायत मार्गदर्शक अॅड. नागेश काकडे, तांदुळवाडीच्या सरपंच भामाबाई जाधव, उपसरपंच शशिकांत कदम व ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.
सोलापूर शहरातील लसीचा साठा संपला, जवळपास 35 लसीकरण केंद्रे बंद #Vaccinestocks #Solapurcity #सोलापूरशहर #depleted #लसीकरण #लसीचासाठा #35vaccination #centers #closed #केंद्रे #बंद pic.twitter.com/xtSOjm06s2
— Surajya Digital (@SurajyaDigital) April 24, 2021
* कृषी केंद्राची १० हजार रुपयांची मदत
तांदूळवाडी ग्रामपंचायत यांच्या वतीने लोकसहभागातून सुरू करण्यात आलेल्या कोवीड केअर सेंटरला येथील कृषी सेवा केंद्राचे प्रमुख नवनाथ बांदल यांनी कोवीड केअर सेंटर च्या खर्चासाठी १० हजार रुपयांची रोख रक्कम मदत म्हणून दिली. ग्रामस्थ आणि दानशूर व्यक्तींनी फळे, औषधे, सॅनिटायझर अथवा रोख रक्कमेचे सहकार्य करावे, असे आवाहन ॲड. नागेश काकडे यांनी केले.