नागपूर : नागपुरात कोरोनाचं थैमान आहे. मात्र कामठीचे भाजप आमदार टेकचंद सावरकर हे मतदारसंघात फिरकलेच नसल्याची स्थानिकांची तक्रार आहे. त्यामुळे आमदार हरवल्याची पोस्ट, सोशल मीडियावर फिरत आहे. संकटाच्यावेळी आमदारांनी जनतेला वाऱ्यावर सोडल्याचा आरोप करत, संतापलेल्या एका मतदाराने, आमदार सावरकर यांचं कोव्हिडमुळे निधन झाल्याची पोस्टही व्हायरल केली. याबाबत सावरकर यांनी वाठोडा पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे.
पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांना काळे झेंडे दाखवून निषेध, केले हे आरोप https://t.co/aNPkyqDBrr
— Surajya Digital (@SurajyaDigital) April 24, 2021
करोनाच्या भयंकर उद्रेकाने हवालदिल झालेल्या नागरिकांकडून संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. समाजमाध्यमांतून पुढाऱ्यांना लक्ष्य करणे सुरू झाले आहे. अशाच प्रकारातून कामठीचे आमदार हरवल्याची पोस्ट व्हायरल झाल्यानंतर चक्क ‘निधन’ आणि ‘श्रद्धांजली’चीही पोस्ट व्हायरल करण्यात आल्याने नागरिकांत खळबळ उडाली. हा प्रकार लक्षात येताच आमदारांनी पोलिस ठाण्यात धाव घेऊन याबाबत तक्रार दाखल केली.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
नितीन गडकरींनी केलेल्या आवाहनाला आंध्र प्रदेश महाराष्ट्राच्या मदतीला धावला https://t.co/ExkEe8W4B3
— Surajya Digital (@SurajyaDigital) April 24, 2021
कामठीचे भाजपचे आमदार टेकचंद सावरकर यांच्यासह जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य हरवल्याची पोस्ट समाजमाध्यमांत व्हायरल करण्यात आली. याची चर्चा सुरू असतानाच एकाने त्यांचे ‘निधन’ झाल्यासह त्यांना ‘श्रद्धांजली’ वाहिल्याची पोस्ट व्हायरल केली. याबाबत आमदार सावरकर यांना कळताच त्यांनी लगेच वाठोडा पोलिस ठाणे गाठून या खोडसाळपणाबाबत तक्रार केली.
पोस्ट टाकणारा प्रीतम व इतर दोघांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी आमदार टेकचंद सावरकर यांनी तक्रारीत केली. ही सर्वसामान्यांची प्रतिक्रिया नाही. पक्षाला बदनाम करण्यासाठी भाजप विरोधकांचा हा डाव असल्याचा दावा टेकचंद सावरकर यांनी केला.
पानिपतहून सिरसा येथे जाणारा ऑक्सिजन टँकर बेपत्ता https://t.co/vUOJQ5q5hO
— Surajya Digital (@SurajyaDigital) April 24, 2021