नागपूर / नाशिक : भारतीय रेल्वेच्या माध्यमातून महाराष्ट्रात ऑक्सिजनचा पुरवठा करण्यासाठी पहिली ऑक्सिजन एक्सप्रेस चालवण्यात आली. ही एक्सप्रेस एकूण सात ऑक्सिजनचे टँकर्स घेऊन राज्यात दाखल झाली आहे. नागपूर येथे या एक्सप्रेसमधून 3 टँकर्स उतरवण्यात आले आहेत. तर उर्वरित चार टँकर्स हे नाशिक रोड स्टेशन येथे उतरवण्यात येणार आहेत. ही ऑक्सिजन एक्सप्रेस शनिवारी म्हणजे आज सकाळच्या सुमारास नाशिकमध्ये दाखल झाली.
सीबीआयची अनिल देशमुखांवर एफआयआर दाखल, घर अन् इतर मालमत्तांवर छापे https://t.co/scBh9AMbgq
— Surajya Digital (@SurajyaDigital) April 24, 2021
महाराष्ट्रात ऑक्सिजनची कमतरता असल्याने परराज्यातून पुरवठा करण्याचं नियोजन करण्यात आलं आहे. राज्याला रेल्वेने ऑक्सिजन पुरवठा करण्यास सुरुवात झाली असून ऑक्सिजन आणण्यासाठी गेलेली रेल्वे महाराष्ट्रात परतली आहे. विशाखापट्टणमधून आणलेले तीन ऑक्सिजन कंटेनर्स रोल ऑन रोल ऑफ (रोरो) ऑक्सिजन एक्सप्रेसमधून शुक्रवारी रात्री नागपूर येथे उतरवण्यात आले. नंतर आज सकाळी ही ऑक्सिजन एक्स्प्रेस नाशिकमध्ये दाखल झाली.
स्वतःच्या 'स्वतंत्र' देशात नित्यानंदची भारतीय प्रवाशांवर 'बंदी' https://t.co/KSTTAxe6QU
— Surajya Digital (@SurajyaDigital) April 23, 2021
विशाखापट्टणम येथून ऑक्सिजनचे सात टँकर भरून निघालेली रेल्वेची पहिली ऑक्सिजन एक्प्रेस अखेर शुक्रवारी रात्री आठ वाजता महाराष्ट्रातील नागपूर स्थानकात दाखल झाली आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
सोमवारी 19 एप्रिल रोजी कळंबोली येथून ही ऑक्सिजन एक्प्रेस विशाखापट्टणम येथे रवाना झाली होती.
महाराष्ट्रात कोविड संकटामुळे ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाल्यानंतर रेल्वेने रो रो सेवेद्वारे ऑक्सिजन पुरविण्याचा निर्णय घेतला होता. परंतु ऑक्सिजनच्या टँकरची वाहतूक करताना काळजी घ्यावी लागत असल्याने मध्य रेल्वेने घाट मार्ग न निवडता व्हाया वसई रोड, जळगाव, नागपूर, रायपूर जंक्शन ते विशाखापट्टणम असा लांबचा मार्ग निवडला. विशाखापट्टणम स्टील प्लांट सायडींगमधून लिक्विड मेडिकल ऑक्सिजन टँकरमध्ये भरून ही ट्रेन महाराष्ट्रात आली आहे. ट्रेन नागपूर स्थानकात पोहचली.
'भारूडरत्न' निरंजन भाकरे यांचे कोरोनाने निधन https://t.co/vQSeDAEnJg
— Surajya Digital (@SurajyaDigital) April 24, 2021
नागपूर स्थानकात सात टँकरपैकी 3 टँकर उतरविण्यात येणार असून उर्वरित टँकर महाराष्ट्रातील नाशिक रोड स्थानकात उतरविण्यात येणार आहेत. त्यासाठी ऑक्सिजन एक्सप्रेस उद्या सकाळी नाशिकरोड स्थानकात पोहोचणार असल्याची माहिती मध्य रेल्वेच्या सूत्रांनी दिली होती.