नवी दिल्ली : कोरोनाचा सर्वाधिक फटका बसलेल्या आपल्या राज्याला आंध्र प्रदेशने 300 व्हेंटिलेटर्स पाठवले आहेत. आंध्र मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांनी ही घोषणा केली आहे. तसेच कोरोना संकटात असलेल्या इतर राज्यांनाही मदत करण्याचा प्रयत्न करत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. यानंतर केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी फोन करून रेड्डी यांचे आभार मानले. गडकरींनी रेड्डींना महाराष्ट्राला मदत करण्यासाठी विनंती केली होती.
मोठा निर्णय ! मे आणि जूनमध्ये मोफत रेशन मिळणार
https://t.co/2JLA9t1Ndu— Surajya Digital (@SurajyaDigital) April 24, 2021
देशात कोरोनाचा कहर सुरूच असून रुग्णांना बेड मिळणे कठीण झाले आहे. महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक रुग्ण आढळून येत असून आरोग्य यंत्रणा तोकडी पडू लागली आहे. रुग्णांना अॉक्सीजन बेडसाठी धावपळ करावी लागत असून व्हेंटिलेटर बेड मिळणे कठीण झाले आहे. केंद्र सरकारने महाराष्ट्राला एक हजार व्हेंटिलेटर देण्याचे मान्य केले आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
महाराष्ट्रामध्ये रुग्णसंख्या अधिक असल्याने बेड अपुरे पडू लागले आहेत. व्हेंटिलेटरची मोठ्या प्रमाणावर कमतरता असल्याने राज्य शासनाकडून केंद्र सरकारकडे व्हेंटिलेटरची मागणी करण्यात आली आहे. त्यादृष्टीने विविध उपाययोजना केल्या जात आहेत.
पण त्याआधीच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी धावून आले आहेत. त्यांनी एका फोनवर आंध्र प्रदेश सरकारकडून 300 व्हेंटिलेटर मिळवले आहेत.
एन. व्ही. रमण्णा यांनी घेतली सरन्यायाधीशपदाची शपथ
https://t.co/LgQ5Jfaqzl— Surajya Digital (@SurajyaDigital) April 24, 2021
गडकरी यांनी ट्विटरवरून ही माहिती दिली आहे. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांना फोन केला होता. महाराष्ट्रातील कोरोनाची परिस्थिती बिकट आहे. त्यामुळे महाराष्ट्राला सहकार्य करावे, ही विनंती त्यांना केली. या विनंतीला मान देत त्यांनी लगेच 300 व्हेंटिलेटर महाराष्ट्राला पाठविले आहेत. या गंभीर परिस्थितीत लोकांचे जीव वाचविण्यासाठी याचा उपयोग होणार आहे. राज्यातील नागरिकांच्यावतीने मी त्यांचे आभार मानतो, असे ट्विट गडकरी यांनी केले आहे.
हायवेच्या कडेला पीपीई किटमध्ये आढळला कुजलेला मृतदेह https://t.co/GX7zhM7tyV
— Surajya Digital (@SurajyaDigital) April 24, 2021
गडकरी यांनी सीएसआर फंडच्या माध्यमातून बीपीएपी व्हेंटीलेटरही मागविले आहेत. नागपुरसह विदर्भातील मेळघाटसारख्या दुर्गम भागातील लोकांचा जीव वाचविण्यासाठी त्याचा उपयोग होणार आहे. तसेच विशाखापट्टणम येथील आरआयएनएन कंपनीतून महाराष्ट्राला दररोज 97 मेट्रिक टन लिक्विड अॉक्सीजन मिळण्यासाठीही गडकरी यांनी प्रयत्न केले आहेत. त्यापूर्वी भिलाईहून 60 टन अॉक्सीजन मिळत आहे. आता दररोज 157 मेट्रिन टन अॉक्सीजन मिळणार असल्याची माहिती गडकरी यांच्या कार्यालयाकडून देण्यात आली आहे.