सोलापूर : शहर-जिल्ह्यात कोरोना रूग्णांबरोबरच मृत्यूचे प्रमाण वाढत आहे. त्यावर मात करण्यासाठी पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज रविवारी नियोजन भवन येथे सर्वच विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक बोलावलीे. भाजप नेते, माजी सभागृह नेते सुरेश पाटील यांनी पालकमंत्री बदलून प्रणिती शिंदे यांना पालकमंत्री करण्याची मागणी केली.
राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाची शक्यता #rain #surajyadigital #पाऊस #अवकाळी #पाच #सुराज्यडिजिटल pic.twitter.com/WZKX4q7f1y
— Surajya Digital (@SurajyaDigital) April 25, 2021
पंढरपूर-मंगळवेढा पोट निवडणुकीनंतर आचारसंहिता शिथिल करण्यास निवडणूक आयोगाने परवानगी दिली. त्यावेळी आपण आचारसंहितेमुळे जिल्ह्याकडे लक्ष देऊ शकलो नसल्याची दिलगिरी पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी व्यक्त केली. मात्र, इंदापूरसाठी उजनीतून पाणी पळविल्याचा आरोप आणि कोरोना काळात हॉस्पिटलमध्ये बेड नाहीत, ऑक्सिजन नाही, रेमडेसिव्हिर इंजेक्शन मिळत नाहीत. लसदेखील पुरेशा प्रमाणात मिळत नाही. या पार्श्वभूमीवर पालकमंत्र्यांवर सत्ताधारी पक्षातील पदाधिकाऱ्यांसह विरोधकांनी आरोप करीत पालकमंत्री बदल्याचीच मागणी केली आहे. आमदार प्रणिती शिंदे यांना पालकमंत्री करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
'आमचे आमदार वारले,' मतदारसंघात न फिरकल्याने पोस्ट व्हायरल https://t.co/I9EzCDj0pY
— Surajya Digital (@SurajyaDigital) April 24, 2021
उजनी धरणातील पाणी इंदापूरला पळविल्याचा आरोप पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्यावर करण्यात येत आहे. मात्र, उजनी धरणातील आरक्षित पाण्यातून एक थेंब जरी मी पळविल्याचे सिध्द झाल्यास, मंत्रीपदासह आमदारकीचा राजीनामा देईन, असे आव्हान त्यांनी दिले आहे. उजनीतील पाणी सोलापुरातील शेतकऱ्यांना, सोलापूर शहरासाठी पुरेशा प्रमाणात मिळत नाही. तशातच इंदापूरला पाणी पळविल्याने नाराजीत भर पडली आहे. सत्ताधारी पक्षातील पक्षांच्या पदाधिकाऱ्यांसह विरोधक आता म्हणत आहेत की, पालकमंत्री नुसतेच गोड बोलतात, आश्वासन देतात, परंतु कोरोना काळात त्यांनी पालकमंत्री म्हणून जिल्ह्यासाठी काहीच केले नाही, असा आरोपही त्यांच्यावर केला जात आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
पंढरपूर-मंगळवेढा पोट निवडणुकीच्या प्रचारात गुंग असलेल्या पालकमंत्र्यांना कोरोना आढावा बैठकीसह ठोस, धोरणात्मक निर्णय घेण्यास निवडणूक आयोगाने नुकतीच परवानगी दिली. त्यानंतर त्यांनी मंगळवेढा, पंढरपूर, माळशिरस, बार्शी, मोहोळ या तालुक्यांची आढावा बैठक घेतली. मागील तीन दिवसांपासून पालकमंत्री दत्तात्रय भरणे हे सोलापूर दौऱ्यावर आहेत. मात्र, त्यांच्याबद्दल नाराजी प्रचंड वाढली असून काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रकाश पाटील यांनी त्यांच्यावर चांगली टीका केली. पालकमंत्री बिनकामाचे असल्याचे म्हणत पालकमंत्री बदलाची मागणी केली.
नाशिक : कोरोनामुळे शिवसेना नगरसेविकेचा मृत्यू #Shivsena #nashikcity #coronavirus #सुराज्यडिजिटल #surajyadigital #शिवसेना pic.twitter.com/gWgcHJ4fV3
— Surajya Digital (@SurajyaDigital) April 25, 2021
तर आज सोलापुरातील नियोजन भवनात आयोजित बैठकीला शिवसेनेचे जिल्हाप्रमुख गणेश वानकर यांना बैठकीला जाताना पोलिसांनी अडविले. त्यांनी वरिष्ठांना कॉल केल्यानंतर त्यांना प्रवेश देण्यात आला. तत्पूर्वी, महापालिकेचे सभागृह नेते श्रीनिवास करली यांनाही अडविण्यात आले. माजी सभागृह नेत्यांना प्रवेश दिलाच नाही. या पार्श्वभूमीवर पालकमंत्रीच बदला, असा सूर आता महाविकास आघाडीच्या नेत्यांसह विरोधकांमधून ऐकायला मिळत आहे. दरम्यान, शनिवारी (ता. 24) बार्शी व अन्य तालुक्यातील लोकांनी पालकमंत्र्यांना विरोध करून काळे झेंडे दाखविले होते.
पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांना काळे झेंडे दाखवून निषेध, केले हे आरोप https://t.co/aNPkyqDBrr
— Surajya Digital (@SurajyaDigital) April 24, 2021
* सभागृह नेत्यांना प्रवेश नाकारला
या बैठकीला शिवसेनेचे जिल्हाप्रमुख गणेश वानकर यांना पोलिसांनी प्रवेश नाकारला. त्यानंतर त्यांनी वरिष्ठ नेत्यांशी संपर्क केला आणि त्यांना प्रवेश देण्यात आला. महापालिकेचे सभागृह नेते त्यांच्या मागण्या घेऊन बैठकीला जात असतानाच त्यांनाही पोलिसांनी थांबविले. मात्र, त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क केला आणि त्यांना प्रवेश देण्याता आला.
#भट #ओसरी #हातपाय #पसरी #थंड #षंड #surajyadigital #पाणी #पळवले #बंड #solapur #सोलापूर #सुराज्यडिजिटल #political #policies #राजकीय
आजचा दै. सुराज्य https://t.co/3Cfx93LYMU &
visit us : https://t.co/Nfgnb9HK8m pic.twitter.com/zwStIh2kO6— Surajya Digital (@SurajyaDigital) April 25, 2021