जकार्ता : इंडोनेशियाची बेपत्ता पाणबुडी केआरआय नंग्गाला 402 सरावादरम्यान समुद्रात बुडाली आहे. यात चालकासह 53 सैनिक ठार झाले. लष्करप्रमुख आणि नौदलाचे चीफ ऑफ स्टाफ यांनी या वृत्तास दुजोरा दिला आहे. दरम्यान, बालीजवळ या बोटीचे अखेरचे दर्शन झाले होते. त्यानंतर पाणबुडीशी संपर्क तुटला होता.
भाजप नेते म्हणाले प्रणिती शिंदेंना करा पालकमंत्री, पालकमंत्री म्हणाले मी संन्यास घेईन https://t.co/a0uvutY8Wq
— Surajya Digital (@SurajyaDigital) April 25, 2021
इंडोनेशियाची बेपत्ता पाणबुडी ‘केआरआय नंग्गाला 402’ सरावादरम्यान भरसमुद्रात बुडाली आहे. यामुळे पाणुबडीवरील चालक दलासह 53 सैनिकांना जलसमाधी मिळाली आहे. इंडोनेशियाच्या नौदलाने यास दुजोरा दिला आहे.
दारु मिळाली नाही तर सॅनिटायझर प्यायले; 6 जणांचा मृत्यू https://t.co/TpjY7z7i6o
— Surajya Digital (@SurajyaDigital) April 24, 2021
लष्कर प्रमुख हादी जाहजंतो यांनी इंडोनेशियाची ‘केआरआय नंग्गाला 402’ पाणबुडी बाली बेटांजवळ बुडाल्याचे सांगितले. तसेच नौदलाचे चीफ ऑफ स्टाफ अॅडमिरल युदो मारगोनो यांनीही प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सांगितले की, पाणबुडी भरसमुद्रात बुडाल्याचे स्पष्ट झाले आहे. पाणबुडीचा विस्फोट झाला असता तर त्याचे तुकडे समुद्रावर आढळून आले असते. तसेच सोनारमध्ये याचा आवाज ऐकू आला असता.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
‘केआरआय नंग्गाला 402’ ही पाणबुडी इंडोनेशियाने जर्मनीकडून खरेदी केली होती. या पाणबुडीचे अखेरचे दर्शन बालीजवळ बुधवारी झाले होते. यानंतर पाणबुडीशी संपर्क तुटला होता. यानंतर नौदलाने पाणबुडी 600 ते 700 मीटर खोल बुडाल्याचा अंदाज व्यक्त केला होता. तसेच याचे पुरावे देखील आढळून आल्याने मारगोनो यांनी पाणबुडी बुडाल्याचे अधिकृतरित्या जाहीरकेले. तसेच आतापर्यंत एकही मृतदेह सापडला नसल्याचेही ते म्हणाले.
'आमचे आमदार वारले,' मतदारसंघात न फिरकल्याने पोस्ट व्हायरल https://t.co/I9EzCDj0pY
— Surajya Digital (@SurajyaDigital) April 24, 2021
दरम्यान, गायब पाणबुडीच्या शोधमोहीमेत जहाजांसह विमान आणि शेकडो नौसैनिक सहभफागी झाले होते. मात्र पाणबुडीमध्ये फक्त 3 दिवस पुरेल इतकाच ऑक्सिजन बाकी होता. शनिवारी हा ऑक्सिजन संपला. त्यानंतरही पाणबुडीचा शोध न लागल्याने ती बुडल्याचे ग्राह्य धरण्यात आले.
‘केआरआय नंग्गाला 402’ ही पाणबुडी एका सरावामध्ये सहभागी झाली होती. यादरम्यान समुद्रामध्ये दबाव न झेलू शकल्याने पाणबुडीसोबत अपघात होऊन ती बुडाली असावी असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. पाणबुडी बुडाली त्या ठिकाणी समुद्राच्या पाण्यावर तेलाचा तवंग पसरला होता.