मुंबई : पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी महाराष्ट्रातील सर्वच नागरिकांना लस मोफत देण्याबाबत ट्वीट करून डिलिट केल्यानंतर भाजप नेते आमदार गोपीचंद पडळकर यांनी त्यांच्यावर टीका केली आहे. बिघाडी सरकारचे लाडके मंत्री आदित्य ठाकरे यांचे ट्विट वाचून आनंद झाला. पण, तो काही क्षणातच विरला. लोकहितासाठी जाहिर केलेला संपूर्ण महाराष्ट्रासाठी ‘मोफत लसीकरणाचा’ निर्णय वापस घेऊ नये हीच अपेक्षा!, असं त्यांनी म्हटलं आहे.
कोरोना काळात भारताला गुगल आणि मायक्रोसॉफ्टकडून मोठी मदत https://t.co/okOUGRMxOw
— Surajya Digital (@SurajyaDigital) April 26, 2021
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
गोपीचंद पडळकर यांनी ट्विट करून हा निशाणा साधला आहे. बिघाडी सरकारचे लाडके मंत्री आदित्य ठाकरे यांचे ट्विट वाचून आनंद झाला. पण तो काही क्षणातच विरला. हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा वारसा सांगणारे तुम्ही आहात, ‘वाटाघाटीʼ आणि ‘टक्केवारीमुळेʼ लोकहितासाठी आणि संपूर्ण महाराष्ट्रासाठी जाहीर केलेला मोफत लसीकरणाचा निर्णय वापस घेऊ नये, हीच अपेक्षा, असा टोला पडळकर यांनी लगावला आहे.
#बिघाडी_सरकारचे लाडके मंत्री @AUThackeray यांचे ट्विट वाचून आनंद झाला. पण तो काही क्षणातच विरला. #हिंदू_हृदयसम्राट #बाळासाहेब_ठाकरे यांचा वारसा सांगणारे तुम्ही आहात, ‘ वाटाघाटी ʼ आणि ‘टक्केवारीमुळे ʼ लोकहितासाठी जाहिर केलेला संपूर्ण महाराष्ट्रासाठी ‘मोफत #लसीकरणाचा’ . pic.twitter.com/gBLC8F33br
— Gopichand Padalkar (Modi Ka Parivar) (@GopichandP_MLC) April 25, 2021
राज्याचे मंत्री आदित्य ठाकरे यांनी राज्यातील जनतेला मोफत लसीकरण करण्याचं ट्विट केलं. ते ऐकून खूप आनंद झाला. पण काही वेळातच त्यांनी ट्विट डिलीट केलं. महाराष्ट्रातील जनतेच्या हिताचा निर्णय त्यांनी मागे घेऊ नये, असंही ते म्हणाले.
शिवसेनेचे दादा भुसे यांच्या मुलाचा खासदार राजन विचारेंच्या कन्येशी विवाह https://t.co/G65k3T4Vg5
— Surajya Digital (@SurajyaDigital) April 26, 2021
आदित्य ठाकरे यांनी ट्विट करून मोफत लसीकरणावर भाष्य केलं होतं. राज्यातील जनतेला मोफत लस देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. आमचं कर्तव्य म्हणून हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे, असं आदित्य यांनी ट्विटमध्ये म्हटलं होतं. मात्र, त्यानंतर हे ट्विट डिलीट करण्यात आलं होतं. त्यामुळे विरोधकांनी आदित्य यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे.
अभिनेत्री पूजा हेगडेला कोरोना, ट्वीट – घरीच रहा, सुरक्षित रहा #सुराज्यडिजिटल #poojahedge #पूजा #coronavirus #surajyadigital #actresses pic.twitter.com/Vu0SJEv45Q
— Surajya Digital (@SurajyaDigital) April 26, 2021