मुंबई : शिवसेनेच्या दिग्गज नेत्यांच्या मैत्रीचं रुपांतर आता नात्यामध्ये झालं आहे. राज्याचे कृषीमंत्री दादा भुसे यांचा मुलगा आणि ठाण्याचे खासदार राजन विचारे यांच्या कन्येचा विवाह झाला आहे. अविष्कार दादाजी भुसे आणि लतीशा राजन विचारे मालेगावमधील आनंद फार्म येथे विवाह बंधनात अडकले. या लग्नासाठी जवळच्या नातेवाईकांनाच निमंत्रण होतं. तर मंत्री छगन भुजबळ या विवाह सोहळ्यात ऑनलाईन सहभागी झाले.
पुण्यातील सर्वच स्मशानभूमी फुल्ल, आता मोकळ्या मैदानांवर होणार अंत्यसंस्कार https://t.co/DoeGnJjNVZ
— Surajya Digital (@SurajyaDigital) April 26, 2021
राज्यात कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर फक्त २ तासाची परवानगी लग्नकार्यसाठी देण्यात आलेली आहे, अशा परिस्थितीत कृषीमंत्री दादा भुसे यांचे चिरंजीव यांचा विवाह ठाण्याचे खासदार राजन विचारे यांच्या मुलीशी आज मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत पार पडला होता, मात्र या लग्नसोहळ्याच्या ठिकाणी मीडियाला नाकारण्यात आल्यामुळे कोरोनाचे नियम पाळले गेले की नाही हे अद्याप गुलदस्त्यात आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
सलमान खाननं 5 हजार लोकांना केलं अन्न वाटप https://t.co/kszWUViuIz
— Surajya Digital (@SurajyaDigital) April 26, 2021
राज्याचे कृषी मंत्री दादा भुसे यांचे चिरंजीव अविष्कार व ठाण्याचे खासदार राजन विचारे यांची कन्या लतीशा यांचा विवाह सोहळा मालेगावच्या एका फार्मवर पार पडला. विवाह सोहळ्याची अतिशय गुप्तता पाळली गेली असून ‘ मोजक्या’ नातेवाईकांव्यतिरिक्त इतर वऱ्हाडी मंडळींना या विवाह सोहळ्यात प्रवेश देण्यात आला नव्हता. या नव्या जोडप्याला आशीर्वाद देण्यासाठी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे आले होते. ज्या फार्म हाऊसवर हा लग्न सोहळा संपन्न झाला त्या फार्म हाऊसच्या वाल कंपाउंडला देखील काळ्या कापडाने झाकण्यात आले होते.
* अनेक प्रश्न उपस्थित
गेटपासून सुमारे एक किमी अंतरावर फार्म हाऊसमध्ये काय चालत आहे, याचा थांगपत्ता लागत नसल्याने विवाह सोहळ्यास किती लोकं उपस्थित होते? त्यांनी मास्क घातले होते की नाही? सोशल डिस्टन्सचे पालन झाले की नाही? आलेल्या पाहुणे मंडळींच्या आरोग्य तपासणीची काय होती व्यवस्था? या विवाह सोहळ्याला परवानगी होती आणि जर होती तर शासनाने घालून दिलेली बंधनं पाळली का? असे अनेक प्रश्न आज उपस्थित राहताना दिसत आहे.
अभिनेत्री पूजा हेगडेला कोरोना, ट्वीट – घरीच रहा, सुरक्षित रहा #सुराज्यडिजिटल #poojahedge #पूजा #coronavirus #surajyadigital #actresses pic.twitter.com/Vu0SJEv45Q
— Surajya Digital (@SurajyaDigital) April 26, 2021