मुंबई : राज्यात बारावीची परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. आता राज्य शिक्षण मंडळाने पुन्हा एक निर्णय घेतला आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांना परीक्षा सुरू होण्याच्या आदल्या दिवसापर्यंत अर्ज भरता येणार आहे. कोणताही विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहू नये, असा यामागे उद्देश आहे. जर कोरोना परिस्थिती नियंत्रणात असली तर बारावीची परीक्षा मेच्या शेवटी किंवा जून महिन्यात होऊ शकते.
काँग्रेसचे दिग्गज नेते एकनाथ गायकवाड यांचे निधन, मंत्री वर्षा गायकवाडांना पितृशोकhttps://t.co/Q5o4IVQVXL
— Surajya Digital (@SurajyaDigital) April 28, 2021
बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे राज्य शिक्षण मंडळानं बारावीची परीक्षा पुढे ढकलली आहे. आता बारावीच्या परीक्षेच्या आदल्या दिवसापर्यंत परीक्षेचा अर्ज भरता येणार आहे. पण त्यासाठी विद्यार्थ्यांना 8,250 रुपये परीक्षा शुल्क भरावं लागणार आहे. 23 एप्रिलपासून परीक्षेच्या आदल्या दिवसापर्यंत विद्यार्थ्यांना अतिविशेष अतिविलंब शुल्कासह परीक्षा अर्ज भरता येईल. कोणताही विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहू नये, यासाठी राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक परीक्षा अर्ज शेवटच्या क्षणापर्यंत भरण्याची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे.
मुंबईत 18 ते 44 वयोगटासाठी लस विकतच घ्यावी लागणार https://t.co/ayjrNBppTT
— Surajya Digital (@SurajyaDigital) April 28, 2021
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
मुंब्रा येथील रुग्णालयात रात्री भयंकर आग, 4 रुग्णांचा मृत्यू, चौकशीचे आदेश, 5 लाखांची मदतhttps://t.co/S8N2yL6S90
— Surajya Digital (@SurajyaDigital) April 28, 2021
बारावीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा नियोजित आहेत. परंतु, परीक्षेचा अर्ज शेवटच्या क्षणापर्यंत भरण्याची मुभा शिक्षण मंडळानं दिली आहे. कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर दहावीची परीक्षा रद्द करण्यात आल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. तर बारावीच्या परीक्षेवर घेण्यात येणार असल्याची माहिती देखील टोपे यांनी जाहीर केलं होतं. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावमुळे राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक घेण्यात आली होती. या बैठकीत परीक्षेसंदर्भात एकमताने निर्णय घेण्यात आला.
रोमहर्षक सामन्यात दिल्लीचा एका धावेनं पराभव, बंगळुरुचा विजय https://t.co/vV1rGMXK1R
— Surajya Digital (@SurajyaDigital) April 28, 2021
दहावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शालेय शिक्षण विभागाच्या माध्यमातून अभ्यास करून या विद्यार्थ्यांचं मूल्यांकन कसं करता येईल तसेच या संदर्भात केंद्र सरकारच्या सूचना याचा विचार केला जाईल आणि त्याचा निर्णय जाहीर केला जाहीर करण्यात येणार असल्याचं त्यावेळी सांगण्यात आलं होतं. तसेच काही तज्ज्ञांशी, महाराष्ट्र बोर्डासोबत चर्चा करून निर्णय घेतला जाईल, असे राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड म्हणाल्या होत्या.
राज्यात कडक निर्बंध दहा दिवस वाढणार, आज होणार बैठकीत निर्णय #lockdown #लॉकडाऊन #maharashtra #कडकनिर्बंध #surajyadigital #TENDAYs pic.twitter.com/3RzWrBZRM2
— Surajya Digital (@SurajyaDigital) April 28, 2021