मुंबई : मुंबईत 18 ते 44 वयोगटातील लोकांना मोफत लस मिळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. कारण, मुंबईतील 18 ते 44 वयोगटातील नागरिकांना सर्व नोंदणीकृत खासगी रुग्णालयातील लसीकरण केंद्रांमध्येच लस देण्यात येईल, असा निर्णय मुंबई महापालिकेने घेतला आहे. दरम्यान, मुंबईत 18 ते 44 या वयोगटात अंदाजे 90 लाख नागरिक आहेत.
मुंब्रा येथील रुग्णालयात रात्री भयंकर आग, 4 रुग्णांचा मृत्यू, चौकशीचे आदेश, 5 लाखांची मदतhttps://t.co/S8N2yL6S90
— Surajya Digital (@SurajyaDigital) April 28, 2021
1 मे, 2021 पासून सुरु होणाऱ्या 18 वर्ष वयावरील नोंदणीकृत नागरिकांच्या कोविड लसीकरणाच्या पार्श्वभूमीवर पूर्वतयारी संदर्भात आयुक्त चहल यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे आढावा बैठक घेतली.
राज्यात 1 मे पासून 18 ते 45 वर्ष वयोगटातल्या नागरिकांचे लसीकरणास सुरुवात करण्यात येणार आहे. आता ही लस मोफत मिळणार की त्यासाठी पैसे मोजावे लागणार यासंदर्भात अजूनतरी निर्णय झालेला नाही. मात्र, याआधीच मुंबई महापालिकेने अजब निर्णय जाहीर केला आहे.
राज्यात कडक निर्बंध दहा दिवस वाढणार, आज होणार बैठकीत निर्णय #lockdown #लॉकडाऊन #maharashtra #कडकनिर्बंध #surajyadigital #TENDAYs pic.twitter.com/3RzWrBZRM2
— Surajya Digital (@SurajyaDigital) April 28, 2021
1 मे पासून मुंबईतील 18 ते 45 वर्ष वयोगटातल्यांना लस केवळ खाजगी रुग्णालयांतच मिळणार आहे. म्हणजे सार्वजनिक रुग्णालयात केवळ 45 वर्षांवरील व्यक्तींचेच लसिकरण होणार असल्याचा निर्णय मुंबई महापालिकेने जाहीर केलाय. आता 18 ते 45 वयोगटातील व्यक्तींना खाजगी रुग्णालयातूनच लस दिली जाणार असल्या कारणानं लसीसाठी या वयोगटाला पैसे मोजावेच लागणार आहे. मात्र, उद्या राज्य सरकारच्या कॅबिनेट बैठकीत लस मोफत घेण्याबाबत काही निर्णय होतात का हेही बघणं महत्वाचं ठरणार आहे. गर्दी टाळण्यासाठी वयोगटानुसार विभाजन केल्याचं महापालिका प्रशासनाचं म्हणणं आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
देशातील 18 वर्षांपेक्षा अधिक वयाच्या नागरिकांना कोविड प्रतिबंध लस देण्याची मोहीम शनिवारी 1 मे, 2021 पासून सुरु होणार आहे. मुंबईत कार्यान्वित असलेल्या महानगरपालिकेच्या आणि शासकीय अशा एकूण 63 केंद्रांवर सद्यस्थितीप्रमाणे 45 वर्ष वयावरील नागरिकांचेच लसीकरण करण्यात येईल. नोंदणीकृत 18 ते 45 वर्ष वयोगटातील नागरिकांना तेथे लस दिली जाणार नाही. मुंबईतील सर्व खासगी रुग्णालयातील लसीकरण केंद्रांमध्येच नोंदणीकृत 18 ते 45 वर्ष वयोगटातील नागरिकांना लस देण्यात येईल, असा महत्त्वपूर्ण निर्णय बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी जाहीर केला आहे.
रोमहर्षक सामन्यात दिल्लीचा एका धावेनं पराभव, बंगळुरुचा विजय https://t.co/vV1rGMXK1R
— Surajya Digital (@SurajyaDigital) April 28, 2021
* गर्दी, गैरसोय होऊ नये म्हणून असा निर्णय
महानगरपालिका आयुक्त इकबाल सिंह चहल म्हणाले की, मुंबईत 18 ते 45 या वयोगटात अंदाजे 90 लाख नागरिक आहेत. या सर्वांसाठी 2 डोस याप्रमाणे सुमारे 1 कोटी 80 लाख डोस द्यावे लागणार आहेत. त्यामुळे या मोहिमेची व्यापकता पाहता, लस साठ्याची पुरेशी उपलब्धता, खरेदी, वाहतूक, वितरण त्यासोबत लसीकरण केंद्रांची संख्या वाढविणे हे सर्व कळीचे मुद्दे आहेत. त्या संदर्भात महानगरपालिकेकडून सरकारकडे आणि लस उत्पादक कंपन्यांकडे देखील सातत्याने पाठपुरावा सुरु आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या उद्या होणाऱ्या बैठकीत लसीकरण मोहिमेसंदर्भातील निर्णय झाल्यानंतर त्या अनुषंगाने महानगरपालिका पुढील कार्यवाही निश्चित करेल. असे असले तरी लसीकरणाची वाढती व्याप्ती पाहता नागरिकांची गर्दी होऊ नये, त्यांची गैरसोय होऊ नये आणि संपूर्ण लसीकरण मोहिमेचे व्यवस्थापन योग्यरित्या व्हावे, म्हणून निर्णय घेण्यात आले आहेत, असे चहल यांनी नमूद केले.