मुंबई : मनसुख हिरेन हत्या प्रकरणात अटकेत असलेला पोलीस निरीक्षक सुनील माने याच्याबाबत धक्कादायक माहिती समोर येत आहे. मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाबाहेरील स्फोटक प्रकरणाचीही पूर्ण कल्पना होती, असे एनआयएने म्हटले आहे. सुनील मानेच्या मोबाईलमधून एक मॅप एनआयएच्या हाती लागला. हा नकाशा प्रियदर्शनी पार्क, चेंबूर ते अँटेलिया परिसरापर्यंतचा आहे. स्फोटक प्रकरणातही मानेचा सहभाग आढळतो का, याचा तपास NIA कडून सुरु आहे.
भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना कोरोनाची लागण https://t.co/qawUNOhGal
— Surajya Digital (@SurajyaDigital) April 29, 2021
सुनील मानेच्या मोबाईलमधून एक मॅप एनआयएच्या हाती लागला आहे. हा नकाशा प्रियदर्शनी पार्क, चेंबूर ते अँटेलिया परिसरापर्यंतचा आहे, अशी माहितीही एनआयएने दिली. या मॅपमध्ये जो रुट आहे, त्याच मार्गावरुन 24 फेब्रुवारीला स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ गाडी अँटिलिया परिसरात आणून पार्क करण्यात आली होती. मनसुख हिरेन हत्या प्रकरणात सुनील मानेने महत्त्वाची भूमिका निभावली आहे. त्याचे अनेक पुरावे एनआयएच्या हाती लागले आहेत. मात्र स्फोटक प्रकरणातही सुनील मानेचा सहभाग आढळतो का, याचा तपास एनआयएकडून सुरु आहे.
लग्नात घुसून गुंडगिरी; जिल्हाधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई, व्हिडिओ – लग्नात घुसला कलेक्टर, पंडितला व नवरदेवाला मारहाणhttps://t.co/JRgeQrdHPW
— Surajya Digital (@SurajyaDigital) April 29, 2021
मनसुख हिरेन यांच्या हत्येच्या दिवशी सुनील माने ठाण्यात होता. त्याने त्याचा फोन एका बॅगेमध्ये ठेवून ती बॅग सहकाऱ्यांच्या माध्यमातून कार्यालयाच्या परिसरातच ठेवली होती. जेणेकरून त्याचे लोकेशन तेच दिसावं. सुनील माने यानेच तावडे बनून मनसुख यांना फोन करुन बोलावून घेतलं. त्यानंतर सचिन वाझे आणि सुनील माने एकत्र त्याला भेटले.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
मोदींचा मोठा निर्णय; ऑक्सिजनची चिंता मिटणार, ५०० पीएसए प्लँटमुळे ऑक्सिजन पुरवठ्यात वाढ होणार
https://t.co/gXZZni3Tcy— Surajya Digital (@SurajyaDigital) April 29, 2021
मनसुख हिरेन यांना भेटताच सुनील माने याने मनसुखचा मोबाईल स्वतःकडे घेतला आणि बंद केला. मनसुख यांना दुसऱ्या गाडीत बसलेल्या काही लोकांच्या हवाली केलं. ज्यामध्ये विनायक शिंदे होता. त्यानेच मनसुख यांची हत्या केल्याचा अंदाज आहे. त्यानंतर माने आणि वाझे मनसुखचा मोबाईल घेऊन वसई परिसरात गेले. त्यांनी काही वेळ मनसुखचा मोबाईल सुरु केला, जेणेकरून पोलिसांना तपासादरम्यान मनसुखचं शेवटच लोकेशन वसई परिसरात मिळावं आणि तपासाची दिशा भरकटली जावी.
राजीव सातव यांची प्रकृती गंभीर; डॉक्टरांची टीम पुण्याला जाऊन उपचार करणार, राहुल गांधींचा पुण्यातील डॉक्टरांना फोन #RajivSatavhttps://t.co/A48Ys9T4vi
— Surajya Digital (@SurajyaDigital) April 29, 2021
सुनील माने याने स्फोटके प्रकरणात वाझेला काय काय मदत केली याचा तपास एनआयएकडून सध्या केला जात आहे. एटीएस या प्रकरणात तपास करत असतानाच सुनील मानेला मनसुख हिरेन हत्या प्रकरणात अटक करणार होती, अशी सूत्रांकडून माहिती मिळते. मात्र त्यापूर्वीच तपास एनआयएकडे सोपवण्याचे आदेश आले होते.
गिरीशभाऊंना राजकारणात जन्माला मी आणले, प्रचारासाठी गल्लोगल्ली मी फिरलो म्हणून आज गिरीश भाऊ दिसतायत – एकनाथ खडसे #political #EknathKhadse #surajyadigital #Girish #mahajan #सुराज्यडिजिटल #एकनाथखडसे #राजकारणhttps://t.co/fCkwFpe58z
— Surajya Digital (@SurajyaDigital) April 29, 2021
सुनील माने हा मुंबईतील कांदिवली क्राईम ब्रांच युनिट 11 मध्ये पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत होता. सध्या त्याची सशस्त्र पोलीस दलात बदली करण्यात आली आहे. दहशतवाद विरोधी पथकाच्या काळाचौकी युनिटमध्ये गेल्या महिन्यात सुनील मानेची चौकशी करण्यात आली होती. त्यानंतर मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणाचा तपास एनआयएकडे हस्तांतरित करण्यात आला होता. सुनील मानेला 23 एप्रिलला एनआयएने अटक केली आहे.