मुंबई : भारतीय पोस्ट विभागानं महाराष्ट्र सर्कलसाठी भरती प्रक्रिया जाहीर केली आहे. महाराष्ट्र सर्कलमध्ये 2428 जागांवर भरती होणार आहे. ग्रामीण डाक सेवक आणि ब्रँच पोस्ट मॅनेजर या पदासाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. दहावी पास विद्यार्थी यासाठी अर्ज करू शकतात. इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यासाठी https://appost.in/gdsonline/ वेबसाईटला भेट द्यावी. यासाठी 27 एप्रिल ते 26 मे या दरम्यान अर्ज करता येईल.
महाराष्ट्रात 15 मेपर्यंत कडक लॉकडाऊन, झाली घोषणा, वाचा नियमावली https://t.co/rc1pNHljyk
— Surajya Digital (@SurajyaDigital) April 29, 2021
भारतीय पोस्ट विभागानं महाराष्ट्र सर्कलसाठी भरती प्रक्रिया जाहीर केली आहे. पोस्टानं त्यांच्या वेबसाईटवर जारी केलेल्या अधिसूचनेप्रमाणं महाराष्ट्र सर्कलमध्ये 2428 जागांवर भरती होणार आहे. ग्रामीण डाक सेवक आणि ब्रँच पोस्ट मॅनेजर या पदासाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. दहावी उत्तीर्ण उमेदवार यासाठी अर्ज करु शकतात. अर्ज करण्यासाठी इच्छुक उमेदवारांनी वेबसाईटला भेट द्यावी. अर्ज प्राप्त झाल्यानंतर दहावीच्या गुणांच्या आधारे गुणवत्ता यादी तयार केली जाईल आणि उमेदवारांना प्रशिक्षणासाठी बोलवलं जाईल.
उजनीचे पाणी : सत्ताधारी मित्रपक्षानेच दिला पालकमंत्र्यांना इशारा; 'याद राखा, नादाला लागू नका' , सोलापूर विरुद्ध इंदापूर असा नवा वाद पेटण्याची चिन्हे https://t.co/aoVIZI9vGh
— Surajya Digital (@SurajyaDigital) April 29, 2021
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
भारतीय पोस्टाकडून जारी करण्यात आलेल्या जाहिरातीनुसार https://appost.in/gdsonline/ या वेबसाईटवर 27 एप्रिल ते 26 मे या दरम्यान अर्ज करता येईल. उमेदवार पोस्टाच्या पोर्टलवर एकदा नोंदणी करु शकेल. नोंदणी क्रमांकाद्वारे विविध सर्कलमधील भरतीसाठी अर्ज करु शकतो.
भाजप नेत्यांच्या बनावट अकाउंटवरुन शरद पवारांना जीवे ठार मारण्याची धमकी, तब्बल २६ जणांच्या विरोधात गुन्हा https://t.co/yON051NYfd
— Surajya Digital (@SurajyaDigital) April 29, 2021
* जागेविषयी अधिक माहिती
ब्रांच पोस्ट मास्टर (BPM), असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर (ABPM) आणि ग्रामीण डाक सेवक (GDS) या पदांच्या 2428 जागांसाठी भरती करण्यात येणार आहे. या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी किमान दहावी पास असणे आवश्यक आहे. यासह सायकलिंग देखील यायला हवे. जर कोणी दुचाकी चालवत असेल तर तो सायकल चालवित असल्याचे मानले जाईल. या पदांवर भरती होण्यासाठी वय 18 ते 40 वर्षे असले पाहिजे. आरक्षित प्रवर्गासाठी वयोमर्यादेमध्ये सूट असेल. एससी आणि एसटीसाठी 5 वर्षे तर ओबीसी प्रवर्गातील उमदेवारांसाठी 3 वर्ष वाढवून दिली जातील. अर्जाची फी 100 रुपये आकारण्यात येईल.
* आरक्षणनिहाय जागा
खुला प्रवर्ग-1105, एसटी- 244, एससी -191, ओबीसी- 565, ईडब्ल्यूएस 246, दिव्यांग- 77 जागांवर भरती होणार आहे.