मुंबई : जुलै किंवा ऑगस्टमध्ये कोरोनाची तिसरी लाट येऊ शकते, अशी भीती व्यक्त करण्यात आली आहे. त्या पार्श्वभूमीवर सज्ज राहण्याचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी तातडीने सर्व यंत्रणांना दिलेत. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ही माहिती दिली. ऑक्सिजनचा मुबलक साठा उपलब्ध होण्यासाठी नियोजन करा, प्रत्येक तालुक्यात ऑक्सिजनचा प्लांट उभारला गेला पाहिजे, अत्यावश्यक औषधांचा साठा तयार ठेवा, असे आदेश ठाकरे यांनी दिलेत.
भाजप नेत्यांच्या बनावट अकाउंटवरुन शरद पवारांना जीवे ठार मारण्याची धमकी, तब्बल २६ जणांच्या विरोधात गुन्हा https://t.co/yON051NYfd
— Surajya Digital (@SurajyaDigital) April 29, 2021
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला रोखण्यासाठी लसीकरणाचा वेग महत्त्वाचा आहे. त्यासाठी पुरेशा प्रमाणात व वेळेवर लस पुरवठा अतिशय गरजेचा आहे. आपण आता १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांना मोफत लस देण्याची घोषणा केली आहे मात्र पुरवठ्यावर त्याचे नियोजन करावे लागेल. तसेच जिल्ह्याजिल्ह्यांमध्ये याची अंमलबजावणी देखील व्यवस्थित पार पाडावी लागणार आहे, अशी महत्त्वाची सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
येत्या काळात आणखी लॉकडाऊन लावावा लागला तरी कोणत्याही परिस्थितीत उद्योगधंदे सुरूच राहायला हवेत, असे महत्त्वाचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले. याशिवाय कोविड स्थितीचा आढावा घेत आणखीही काही सूचना त्यांनी केल्या.
नोकरीची मोठी संधी; भारतीय पोस्ट विभागात आजच करा अर्ज https://t.co/bn0pg6Ry8V
— Surajya Digital (@SurajyaDigital) April 30, 2021
* मुख्यमंत्री ठाकरेंनी घेतली बैठक
कोरोना परिस्थितीसंदर्भात मुख्यमंत्री ठाकरे यांनी विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, पालिका आयुक्त यांच्याशी दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठक घेवून चर्चा केली. यावेळी विविध बाबींचा मुख्यमंत्र्यांनी आढावा घेतला. राज्यातील कडक निर्बंधांमुळे काही प्रमाणात रुग्णसंख्या स्थिरावली असली तरी आपल्याला आता अतिशय सावध राहून पुढील तिसऱ्या लाटेचे नियोजन करावे लागेल, असे मुख्यमंत्री म्हणाले. कडक निर्बंध लावल्यानंतर लगेचच रुग्णसंख्या कमी होते असे नाही.
महाराष्ट्रात 15 मेपर्यंत कडक लॉकडाऊन, झाली घोषणा, वाचा नियमावली https://t.co/rc1pNHljyk
— Surajya Digital (@SurajyaDigital) April 29, 2021
तरी देखील वेळेत कडक निर्बंध लावल्याने अंदाजित मोठी रुग्णवाढ आपण रोखू शकलो, असे नमूद करताना निर्बंधांच्या काळात दुर्बल घटकांसाठीच्या जाहीर पॅकेजप्रमाणे या घटकांना तात्काळ लाभ द्यावा. केवळ घोषणा नव्हे तर त्याची प्रत्यक्षात अंमलबजावणी झालेली दिसली पाहिजे, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी जिल्हा प्रशासनांना दिल्या.