बेळगाव : बेळगाव पोटनिवडणुकीत भाजपच्या उमेदवार मंगला अंगडी यांचा विजय झाला आहे. मंगला यांना 440327 मिळाली. तर काँग्रेसचे उमेदवार सतीश जारकीहोळी यांना 435087 मते मिळाले आहेत. तर शिवसेनेने समर्थन दिलेल्या महाराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवार शुभम शेळके यांना 117174 मते मिळाली. दरम्यान, भाजपच्या मतात विभाजन करण्यासाठी शिवसेनेने शुभम शेळके यांना उभे केल्याचा आरोपही झाला होता.
पंढरपूरचा निकाल – ठाकरे सरकारला धक्का, भाजप नेत्यांच्या प्रतिक्रिया; राजू शेट्टींनी मतदारसंघ पिंजून काढला पण, उमेदवाराला आणि अभिजित बिचकुलेंना डिपॉझिट वाचवणे अवघड
https://t.co/xYcRH4WKDG— Surajya Digital (@SurajyaDigital) May 2, 2021
कर्नाटकच्या बेळगाव पोटनिवडणुकीत भाजपची उमेदवार मंगला अंगडी विजयी झाली आहे. मंगला अंगडी यांनी कॉंग्रेसचे उमेदवार सतीश जारकिहोळी यांचा 2 हजार 903 मतांनी पराभव केला आहे. सकाळपासूनच या दोन्ही उमेदवारांमध्ये जोरदार स्पर्धा सुरू होती. केंद्रीय मंत्री सुरेश अंगडी यांच्या निधनानंतर बेळगावमध्ये पोटनिवडणूक झाली. या निवडणुकीत भाजपने दिवंगत नेते सुरेश अंगडी यांची पत्नी मंगला अंगडी यांना उमेदवारी दिली.
शिवसेनेच्या आवाहनानंतरही भाजपचीच बेळगाव लोकसभा पोटनिवडणुकीत मुसंडी #surajyadigital #Byelection #belgaum #भाजपा #शिवसेना #Shivsena #मुसंडी #सुराज्यडिजिटल pic.twitter.com/ODyBi8ABBy
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 2, 2021
तर, सतीश जारकीहोली कॉंग्रेसकडून ही निवडणूक लढवत होते. परंतु, मंगला अंगडी यांनी निवडणूक जिंकून बेळगावमध्ये भाजपचा झेंडा फडकला आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
बेळगाव लोकसभेच्या पोटनिवडणुकीत एकूण 10 उमेदवार रिंगणात होते. भाजपकडून मंगला अंगडी काँग्रेसकडून सतीश जारकीहोळी तर महाराष्ट्र एकिकरण समितीचे उमेदवार शुभम शेळके हे रिंगणात होते. कर्नाटक राष्ट्र समितीकडून विवेकानंद बाबू घंटी उमेदवार होते. अटीतटीची झालेल्या या निवडणुकीत अगदी शेवच्या फेरीपर्यंत चुरस कायम होती. शेवटच्या तीन फेऱ्या असताना भाजपच्या मंगला अंगडी यांनी पुन्हा आघाडी घेतली होती. 3500 मतांनी आघाडीवर असलेल्या मंगला अंगडी यांनी अखेर 2903 मतांनी विजय मिळवला आहे.
पंढरपूरचा निकाल : राष्ट्रवादी काँग्रेसचा पराभव, भाजपचा 3716 मतांनी विजय, 'शिवसेना, राष्ट्रवादीला दुसऱ्याच्या लग्नात नाचण्याची 'सवय' https://t.co/Zg9PRZSlmi
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 2, 2021
बेळगावातील ही पोटनिवडणूकही बऱ्याच काळापासून महाराष्ट्र व कर्नाटकमधील सीमा वादाचे केंद्र आणि महाराष्ट्रातील सीमेवर असल्याने भाजपा विरुद्ध शिवसेना म्हणूनही पाहिले जात होते. परंतु, काँग्रेस व शिवसेनेचा विजय खेचून मंगला अंगडी बेळगावात भाजपचा झेंडा रोवला आहे.
मोठा उलटफेर, ममता बॅनर्जी हरल्या; कार्यकर्त्यांना मोठा धक्का https://t.co/1U60Sj4D3w
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 2, 2021
* महाराष्ट्र एकिकरण समितीला नवसंजीवनी
भाजपच्या उमेदवार अंगडी यांनी 4 लाख 40 हजार 327 मते मिळाली तर काँग्रेसचे सतीश जारकीहोळी यांना 4 लाख 35 हजार 87 मते मिळाली महाराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवार शुभम शेळके यांना 1 लाख 24 हजार 642 मते मिळाली. याआधी मध्ये समितीने लोकसभेला सर्वोच्च 1 लाख 8 हजार 490 मते 1989 मध्ये मिळवली होती. त्यावेळी समितीचे 3 आमदार होते. आता समितीचा एकही आमदार नाही. तरीही विक्रमी मते मिळाल्याने समितीला नवसंजीवनी मिळाली आहे.
शरद पवार, संजय राऊत यांनी केले ममता दीदींचे अभिनंदन, नंदीग्राममधून ममता बॅनर्जी 3 हजार 372 मतांनी आघाडीवर
https://t.co/9IcNpFx2ZL— Surajya Digital (@SurajyaDigital) May 2, 2021