पुणे : 4 ते 5 तरुणांनी मिळून एका तरुणाची हत्या केली आहे. ही घटना चाकण औद्योगिक वसाहतीतील म्हाळुंगे येथे घडली. अतुल भोसले असं मृत तरुणाचं नाव आहे. अतुलवर भर रस्त्यावर 4 ते 5 जणांनी हल्ला केला. घटना CCTV कै आहे. 2 दिवसांपूर्वी मयत अतुल आणि आरोपी अक्षय शिव यांच्यात वाद झाला. याच कारणावरून अक्षय शिवलेने गणेश ढरमाळे, गोट्या भालेराव आणि आणखीन तीन साथीदारांच्या मदतीने अतुलचा खून केला. मारेकरी फरार आहेत.
चक्रीवादळाचा परिणाम महाराष्ट्रभर अनेक जिल्ह्यात वादळी वारे, पाऊस सुरु https://t.co/tiBE8fSVaJ
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 16, 2021
चाकण औद्योगिक वसाहतीतील म्हाळुंगे येथे चार ते पाच तरुणांनी मिळून एका तरुणावर प्राणघातक हल्ला केल्याची घटना समोर आली होती. आरोपींनी तरुणावर कोयत्याने वार केल्याने तो रक्तबंबाळ झाला होता. त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र, त्याची मृत्यूशी सुरु असलेली झुंज अखेर अयशस्वी ठरली. डॉक्टरांनी त्याला वाचवण्यासाठी शर्थीने प्रयत्न केले. मात्र, त्याची प्राणज्योत मालवली. मृतक मुलाचे नाव अतुल भोसले असल्याचं समोर आलं आहे. अतुलवर भर रस्त्यावर चार ते पाच जणांनी हल्ला केला होता. या घटनेचा थरार सीसीटीव्हीत कैद झाला आहे.
दिल्लीत झळकले पोस्टर, १५ जणांना अटक, राहुल गांधी म्हणाले, मलाही करा अटक https://t.co/rYzBaE5KER
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 16, 2021
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
पुण्याजवळील चाकण औद्योगिक वसाहत परिसरामध्ये अनेक लहान-मोठे उद्योग सुरू आहेत. याच उद्योगांना लागणाऱ्या पाणी पुरवठ्याच्या कारणावरून तरुणावर लोखंडी कोयत्याने वार करत जीवे मारण्याची घटना समोर आले आहे. या हल्ल्यात अतुल भोसले याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
रुग्णवाहिकेत अश्लील चाळे केल्याप्रकरणी चौघांना अटक https://t.co/ZxL80ImJy3
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 16, 2021
दोन ते तीन दिवसापूर्वी मयत अतुल भोसले आणि आरोपी अक्षय शिवले या दोघांमध्ये चाकण औद्योगिक वसाहतीमधील एका कंपनीमध्ये पाणी टँकर पुरवण्याच्या कारणावरून फोनवर वादावादी झाली होती. त्याच कारणावरून चिडून आरोपी अक्षय शिवले, गणेश ढरमाळे, गोट्या भालेराव यांनी दोन ते तीन साथीदारांच्या मदतीने मयत अतुल भोसले याला लोखंडी कोयत्याने जखमी करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. रस्त्यावर गंभीर जखमी अवस्थेत पडलेल्या अतुल भोसलेला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. आरोपी अक्षय शिवले, गणेश ढरमाळे, गोट्या भालेराव आणि त्यांचे दोन ते तीन साथीदार फरार आहेत.
चारवेळा संसदरत्न पुरस्कार सन्मानित खासदार राजीव सातव यांचे निधन, कोरोनाची चाचणी निगेटिव्ह येऊनही मृत्यू, झुंज अपयशी https://t.co/dNFQpyf1GQ
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 16, 2021