सोलापूर : प्रिसिजन समूहाच्या पुढाकारातून मोदी स्मशानभूमीतील बंद असणारी पहिली विद्युतदाहिनी आज बुधवारी (दि. १९) कार्यान्वित झाली. प्रिसिजन कॅमशाफ्ट्सचे चेअरमन यतिन शहा यांनी सोलापूर महानगरपालिकेचे उपायुक्त धनराज पांडे यांच्याकडे आज याबाबतचं हस्तांतरण पत्र सुपूर्द केलं.
सोलापुरात म्युकरमायकोसिसचे 50 पेक्षा अधिक रुग्ण, चारजणांचा मृत्यू https://t.co/SaVABURcEL
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 19, 2021
कोरोना महामारीमुळे सोलापुरात मृतांची संख्या वाढत असून फूटाफूटाच्या अंतरावर चिता रचाव्या लागत आहेत. इतकंच नव्हे तर अनेक मृतदेह वेटिंगवर ठेवावे लागत आहेत. ही वस्तुस्थिती सोलापुरातील माध्यमांनी गेल्या काही दिवसांपूर्वी मांडली होती. या पार्श्वभूमीवर मोदी स्मशानभूमीतील पहिली विद्युतदाहिनी तत्काळ सुरू व्हावी, असं आवाहन उपायुक्त पांडे यांनी सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने केलं होतं. सामाजिक बांधिलकीच्या दृष्टीने पुढाकार घेत प्रिसिजन समूहाने आपल्या सीएसआर निधीतून ही विद्युतदाहिनी कार्यान्वित केली आहे.
कोरोनाबाधित रुग्णांवर विनापरवाना उपचार विनित हॉस्पिटलवर फौजदारी गुन्हा, आर्युवेद शिक्षण आणि बोर्डावर अॅलोपॅथीची डिग्री
https://t.co/EPiB6pUFdC— Surajya Digital (@SurajyaDigital) May 19, 2021
विद्युतदाहिनीमध्ये नव्या कॉईल्स व नवा ब्लोअर बसविण्यात आला आहे. ट्रॉन्सफॉर्मरचीही दुरूस्ती करण्यात आली आहे. श्रद्धांजली सभागृहासह संपूर्ण स्मशानभूमीची रंगरंगोटी केली आहे. रात्रीच्या वेळी पुरेसा प्रकाश मिळावा यासाठी नवे लाईट्स बसविण्यात आले आहेत. प्रवेशद्वारासमोरील पटांगणात चाफ्याची झाडं लावून सुशोभीकरण करण्यात आलं आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
अस्थी गोळा करण्यासाठी कुंड्या ठेवण्यात आल्या असून आवश्यक ते माहितीफलकही लावण्यात आले आहेत. विशेष म्हणजे प्रिसिजनच्या टीमने अत्यंत वेगाने काम करत अवघ्या एक महिन्याच्या कालावधीत हे नूतनीकरण पूर्ण केलं. यासाठी यतिन शहा यांनी स्वतः वारंवार मोदी स्मशानभूमीला भेट देऊन कामाचा आढावा घेतला होता.
सोलापूर जिल्हा दूध संघाच्या कार्यकारी संचालकावर बडतर्फची कारवाई https://t.co/RbHU4B4mJT
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 19, 2021
या योगदानाबद्दल उपायुक्त पांडे यांनी प्रिसिजन समूहाचे आभार मानले. नूतनीकृत मोदी स्मशानभूमीचं पावित्र्य जपण्यासाठी सोलापूरकरांनीही महापालिकेला सहकार्य करावं असं आवाहन त्यांनी केलं.
या हस्तांतरणावेळी प्रिसिजनचे वरिष्ठ अधिकारी प्रदीप महिंद्रकर व सिद्धेश्वर चंदनशिवे, जनसंपर्क अधिकारी माधव देशपांडे व आदित्य गाडगीळ, मोहसीन अत्तार, अस्लम कलादगी तसेच सोलापूर महानगरपालिकेचे झोनल ऑफिसर विजयकुमार लोखंडे, विद्युत विभागाचे राजेश परदेशी व परवेज शेख, मुख्य आरोग्य निरीक्षक सुधाकर नागटिळक यांच्यासह आरोग्य विभागाचे पूनम कांबळे, श्रीशैल हिंगमिरे, राजू डोलारे हे उपस्थित होते.
उद्या निवडणुका घ्या, मोदी 400 पेक्षा जास्त जागा जिंकतील, काँग्रेसच्या टूलकिटवर हल्लाबोल
https://t.co/Z91rFHk9HY— Surajya Digital (@SurajyaDigital) May 19, 2021