नवी दिल्ली : एसबीआयने अनेक नियमांमध्ये बदल केला आहे. एटीएममधून पैसे काढण्याच्या नियमातही बदल झाला आहे. यानुसार आता एसबीआयच्या एटीएममधून किंवा शाखेतून एका महिन्यात फक्त 4 वेळाच कोणत्याही शुल्काशिवाय पैसे काढता येणार आहेत. यानंतर पैसे काढल्यास शुल्क भरावे लागणार आहे. पाचव्यांदा आणि त्यानंतर पैसे काढण्यासाठी 15 रुपये आणि जीएसटी शुल्क ग्राहकांना द्यावे लागणार आहे. 1 जुलैपासून हा नियम लागू होणार आहे.
शिवसेनेच्या आमदाराची गाडी पेटवण्याचा प्रयत्न, संजय गायकवाडांचे हल्लेखोरांना आव्हान https://t.co/yNbleLTKY4
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 26, 2021
स्टेट बँक ऑफ इंडियाच्या ग्राहकांच्या खिशाला 1 जुलैपासून कात्री लागणार आहे. SBI बेसिक सेव्हिंग्स बँक डिपॉझिट खातेदारांसाठी नवे चार्जेस 1 जुलै 2021 पासून लागू होणार आहेत. बँकेने एटीएममधून पैसे काढणं, चेकबुक, मनी ट्रांसफर आणि नॉन फाइनेंशियल ट्रांझेक्शनवर सर्व्हिस चार्जेस वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. बँकेने याबाबत त्यांच्या अधिकृत वेबसाईटवर माहिती दिली आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
वृत्तानुसार, ग्राहकांनी एका महिन्यात 4 पेक्षा जास्त वेळा एसबीआयच्या शाखेतून अथवा एटीएममधून पैसे काढल्यास त्यासाठी 15 रुपये आणि जीएसटीची रक्कम आकारली जाईल. प्रत्येक ट्रांझेक्शनसाठी तुम्हाला इतका चार्ज द्यावा लागेल. हा नियम एसबीआय एटीएम आणि इतर बँकांच्या एटीएमसाठी लागू होईल.
कुणाच्या बापामध्ये मला अटक करण्याची हिम्मत नाही, एक हजार कोटींचा अब्रुनुकसानीची दावा https://t.co/RPzCHLbNvJ
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 26, 2021
स्टेट बँक ऑफ इंडिया बीएसबीडी खातेदारांकडून चेकबुकसाठी पैसे घेत नाही. मात्र, 10 चेक झाल्यानंतर 40 रुपये आणि जीएसटी आकारले जाते. तर, 25 चेक असणाऱ्या चेकबुकसाठी 75 रुपये आकारले जातील. याशिवाय इमर्जन्सी चेकबुकसाठी 50 रुपये आणि जीएसटी चार्ज द्यावा लागेल. या नियमांमधून ज्येष्ठ नागरिकांना सूट देण्यात आली आहे.
कोरोनाला पळवून लावण्यासाठी भाजपा नेत्याने केले होमहवन https://t.co/Rig8kIJ2GO
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 26, 2021