सोलापूर : मोहोळ तालुक्यातील घाटणे गाव कोरोनामुक्त झालं आहे. तरुण सरपंच ऋतुराज देशमुख यांनी ग्रामस्थांना सोबत घेऊन गाव कोरोनामुक्त केलं. देशमुख यांनी ग्रामस्थांना एकत्र करत गावात ‘बी पॉझिटिव्ह, आपला गाव ठेवू कोरोना निगेटिव्ह’ ही मोहीम राबवली. परिणामी गावात कोरोना रुग्णसंख्येत घट होत गेली. सध्या गाव पूर्णपणे कोरोनामुक्त झाले आहे.
दया, क्षमा, शांती, त्याग, सेवा, समर्पणाच्या विचारांमध्येच अखिल मानव जातीचं कल्याण सामावलं आहे, हाच भगवान गौतम बुद्धांचा संदेश आहे… स्मृतीस त्रिवार वंदन !…#surajyadigital #बुद्धपौर्णिमा #सुराज्यडिजिटल #budha #स्मृती #अभिवादन pic.twitter.com/zel8tVu3sT
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 26, 2021
31 मे ला अहिल्यादेवी जयंती दिवशी, धनगर समाजाच्या आरक्षणाचा जागर करा, आणि या महाविकास आघाडीच्या गड्यांना हादरा द्या – आमदार गोपिचंद पडळकर #surajyadigital #धनगर #आरक्षण #जागर #reservations #सुराज्यडिजिटल #चौंडी #गोपिचंदपडळकर https://t.co/5qDT2DoEVA
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 26, 2021
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात संसर्ग वाढला आहे. कोरोना साखळी तोडण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा तारेवरची कसरत आहे. अशा परिस्थिती ‘बी पॉझिटिव्ह, आपला गाव ठेवू कोरोना निगेटिव्ह’ ही मोहीम राबवत जिल्ह्यातील सर्वात तरुण सरपंच ऋतुराज देशमुख यांनी ग्रामस्थांना सोबत घेऊन गाव कोरोनामुक्त केलाय. मोहोळ तालुक्यातील घाटणे गावाने ही किमया साधली आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
शंभरी गाठली…
पेट्रोलने एकदाची शंभरी गाठली, याच्यापुढेही जावू शकते का? आपणास काय वाटते #fuelpump #surajyadigital #fuel #fuelprise #इंधन #शंभरी #सुराज्यडिजिटल #Rs100 pic.twitter.com/ce33cMH5Zz— Surajya Digital (@SurajyaDigital) May 26, 2021
कोरोनाच्या पहिल्या लाटेत वाचलेलं घाटणे गाव दुसऱ्या लाटेत मात्र सापडलं. मार्चपर्यंत एकाही कोरोना रुग्णाची नोंद गावात झाली नव्हती. मात्र, एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात गावात पहिला रुग्ण आढळला. त्यानंतर रोजच रुग्ण आढळू लागले. अशा परिस्थितीमध्ये सरपंच ऋतुराज देशमुख यांनी ग्रामस्थांना एकत्र करत गावात ‘बी पॉझिटिव्ह, आपला गाव ठेवू कोरोना निगेटिव्ह’ ही मोहीम राबवली. गावकऱ्यांनीही यात सहभाग घेऊन सरपंचांना साथ दिली. परिणामी गावात कोरोना रुग्णसंख्येत घट होत गेली. सध्या गाव पूर्णपणे कोरोनामुक्त झाले आहे.
मर्दानी पोवाडा गाणाऱ्या तमाशा सम्राज्ञी कांताबाई सातारकर यांचे निधन https://t.co/eD9F6WYfEY
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 26, 2021
घाटणे गावचा एक सेवक म्हणून मला तुमच्या सहकार्याची गरज आहे. तुमच्या उत्तम आरोग्यासाठी आपले पूर्ण सहकार्य देऊन गाव कोरोनामुक्त ठेवण्यासाठी योगदान द्यावे, असे आवाहन ऋतुराज देशमुख यांनी ग्रामस्थांना केले. या मोहीमेअंतर्गत गाव कोरोनामुक्त करण्यासाठी रुग्णांचा शोध, तपासणी, उपचार, लसीकरण, नियमांचे काटेकोरपणे पालन या पंचसूत्रीच्या आधार घेण्यात आला.