मुंबई : अभिनेता कमाल आर खानने सलमान खानच्या राधे चित्रपटावर समीक्षा करताना अतिशय वाईट सिनेमा असल्याचे म्हटले. त्यावर सलमानला एवढा राग आला की त्याने थेट कमाल आर खानवर मानहानीचा दावा केला. यानंतर कमाल घाबरला आणि आपण यापुढे सलमानच्या चित्रपटांची समीक्षा करणार नाही, तेवढं त्याला हे प्रकरण येथेच मिटवण्यास सांगा, असे ट्विट केले आहे.
Salim Khan Sahab father of Salman has said in his interview that Radhe is a bad film. Means he is giving signal to Salman that he should accept that his film is bad, instead of filing defamation case against me. Thank you Salim Sahab for supporting truth.
— KRK (@kamaalrkhan) May 27, 2021
बॉलिवूड दबंग अभिनेता सलमान खान याचा नुकताच ‘राधे:युवर मोस्ट वॉन्टेड भाई’ हा चित्रपट रिलीज झाला. प्रेक्षकांच्या तसेच समीक्षकांच्या याला समिश्र प्रतिक्रिया मिळाल्या आहे. पण अभिनेता कमाल आर खान याला भाईजानच्या चित्रपटाचा रिव्ह्यू करणे चांगलेच महागात पडले आहे. सलमान खानने कमाल विरोधात मुंबई हाय कोर्ट मध्ये मानहानिचा दावा दाखल केला आहे. सोमवारी सलमान खानच्या अधिकृत टिमतर्फे कमाल आर खानला नोटिस बजावण्यात आली आहे. तसेच सलमान खानची टिम गुरुवारी सिविल कोर्टाच्या एका ॲडिशनल सेशन जजच्या समोर तात्काळ याची सुनावणी केली जाणार असल्याचे बोलण्यात येत आहे.
You all can see hundreds of bad reviews of #Radhe on YouTube but Salman doesn’t have any problem with anyone except #TheBrandKRK! Now it’s proof that #DRKRK is The No.1 Critic in the history of Bollywood. All others are just Chai Cum Paani. Stars don’t care about their reviews.
— KRK (@kamaalrkhan) May 27, 2021
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
सलमान खान तर्फे नोटिस बजावल्या नंतर कमाल खानने ट्विट करत लिहले आहे की,”डियर सलमान खान मानहानिची केस तुमच्या हताश आणि नाराज होण्याचा पुरावा आहे. मी माझ्या फॉलोवर्ससाठी रिव्ह्यू करतो आणि माझे काम करतो. माला तुमच्या चित्रपटाचे रिव्ह्यू बनवण्यापासून रोखण्यापेक्षा तुम्ही काही च्ंनग्ले सिनेमा बनवला पाहिजे. मी खरेपणासाठी नेहमी उभा रहेण आणि लढेल. धन्यवाद… ”
https://twitter.com/kamaalrkhan/status/1397181935370260485?s=19
कमाल खान यूट्यूबवर आपल्या वेगळ्या शैलीत,अंदाजात बॉलिवूड सिनेमाचे रिव्ह्यू करतो. ‘राधे’ चित्रपटाचा रिव्ह्यू देखील त्यांनी केला होता. दुबई मध्ये कमाल यांनी चित्रपटाचा फर्स्ट हाफ पहिल्या नंतर त्यांनीरिव्ह्यू केला. त्यांना सिनेमा फारसा आवडला नाही.
चारवेळा पंतप्रधानांनी भेट नाकारली, पूर्वी चाळीस वेळा भेट दिली, का सांगत नाहीत ? https://t.co/QNNOkO2Ljm
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 27, 2021
केआरके ने राधेच्या प्रदर्शनानंतर चित्रपटाचा रिव्हू दिला होता. ज्यात त्याने चित्रपटाला अतिशय खराब म्हटलं होतं. तर आपण अर्ध्यापेक्षा जास्तवेळ चित्रपट पाहू शकले नाही असही म्हटलं होत. तो व्हिडीओ फार व्हायरल देखिल झाला होता. त्यानंतर केआरकेवर ही केस करण्यात आली.
दरम्यान सलमान खान किंवा त्यांच्या टिम मधील कोणीही अद्याप या गोष्टीवर कोणतच भाष्य केलेलं नाही. तर केआरके ने त्याच्या ट्वीट सोबत नोटीस पेपरचाही फोटो पोस्ट केला होता.
"मराठा आरक्षणासाठी आपण पुढाकार घ्यावा" https://t.co/QevQLlYFpx
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 27, 2021