सोलापूर : उजनी धरणातून इंदापूर तालुक्यासाठी मंजूर केलेल्या पाच टीएमसी पाण्याचा आदेश आज गुरुवारी (ता. २७) जलसंपदा विभागाने रद्द केला आहे. उजनी धरणातून इंदापूरला पाणी वळवण्यास सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी तीव्र विरोध केला होता.
अखेर उजनीतून 5 TMC पाणी उपसा आदेश रद्द #surajyadigital #ujjain #cancelled #TMC #सुराज्यडिजिटल #उजनी #आदेश #order #रद्द pic.twitter.com/azdAzHJsSw
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 27, 2021
उजनीचे ५ टीएमसी पाणी इंदापूर तालुक्याला नेण्यासाठी प्रस्तावित केलेल्या योजनेच्या सर्वेक्षणाचे आदेश रद्द करण्यात येत असल्याचे जलसंपदा विभागाचे उपसचिव वैजिनाथ चिल्ले यांनी गुरूवारी दुपारी जारी केले.
शेतकऱ्यांची फसवणूक करणा-या जलसंपदामंत्र्यांवर गुन्हा दाखल करा https://t.co/KMN4QFaEbH
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 26, 2021
जलसंपदा विभागाचे उपसचिव चिल्ले यांनी २२ एप्रिल रोजी उजनी धरणातून ५ टीएमसी पाणी इंदापूर तालुक्यातील खडकवासला उपसा सिंचन योजनेमध्ये नेण्यासाठी सर्वेक्षण करण्याच्या प्रस्तावाला मंजूरी देण्याबाबतचे आदेश जारी केले होते. त्यानंतर पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी पंढरपूर दौ-यात इंदापूरला उजनीतून ५ टीएमसी पाणी नेण्यास शेटफळ गडी उपसा सिंचन योजनेला शासनाने मंजूरी दिल्याचे जाहीर केले होते. त्यानंतर या योजनेच्या कामास सोलापूर जिल्ह्यातील तीव्र विरोध झाला. शेतकरी संघटना, लोकप्रतिनिधींनी या निर्णयास विरोध केला. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस व भाजप आमदार व खासदारांनी उजनीतून इंदापूरला पाणी नेण्यास विरोध केला होता.
उजनी धरणाच्या गेटवर जलसंपदामंत्री जयंत पाटील यांचा पुतळा जाळला (संतोष वाघमारे -टेंभुर्णी )#surajyadigital #ujjain #सुराज्यडिजिटल #जयंतपाटील #jayantpatil #पुतळा #status https://t.co/TA5BOjq4HY
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 24, 2021
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
राष्ट्रवादीचे आमदार बबनदादा शिंदे, संजय शिंदे, आ. यशवंत माने या तिघांनी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांची भेट घेऊन निवेदन दिले. उजनी पाणी वाटपाची वस्तूस्थिस्थी निर्दशनास आणली. त्यानंतर जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी २२ तारखेचा आदेश रद्द केल्याचे जाहीर केले होते, त्याबाबत लेखी आदेश निघाला नसल्याने जनहित शेतकरी संघटनेच्या सदस्यांनी उजनी धरणाच्या प्रवेशव्दारावर आंदोलन सुरूच ठेवले होते.
उजनी धरणाच्या गेटवर जलसंपदामंत्री जयंत पाटील यांचा पुतळा जाळला https://t.co/sBigiW6Nqx
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 24, 2021
आंदोलनादरम्यान जलसंपदा मंत्री पाटील यांचा पुतळाही जाळला होता. त्यामुळे शासनाने २७ मे रोजी दुपारी रद्द चा आदेश जारी केला आहे.
विविध शेतकरी संघटनांसह पाणी संघर्ष समितीने सरकार विरोधात आंदोलनाचे हत्यार उपसले होते. मागील महिनाभरापासून जिल्ह्यात विविध ठिकाणी रास्ता रोको आंदोलनही करण्यात आले होते. काल (बुधवारी) शरद पवार यांच्या गोविंद बागेतील निवास स्थानाबाहेर कार्यकर्त्यांनी आंदोलन करण्याचा प्रयत्न केला होता. आज (गुरुवारी) जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या इस्लामपूर येथील घरासमोर बोंबाबोब आंदोलन करण्यात आले.
वादग्रस्त पुस्तकावरून लेखक, पत्रकार गिरीश कुबेर यांच्यावर पुण्यात गुन्हा दाखल https://t.co/TdgtZ553bR
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 27, 2021