ठाणे : पेट्रोलच्या दराने शंभरी गाठली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने याचा निषेध करण्यासाठी ठाण्यात बॅनर लावण्यात आला आहे. राष्ट्रवादीने हरिनिवास सर्कल इथे एक बॅनर लावला. या बॅनरवर पांढऱ्या दाढीवाल्या फलंदाजाचे चित्र असून त्याने शतक पूर्ण केल्याचे नमूद केले आहे. तसेच या फलकावर ‘मॅन ऑफ दि मॅच; पेट्रोल 100 नॉट आऊट; अच्छे दिनाच्या शुभेच्छा’, असं लिहिलं आहे. दरम्यान, या फलकाची सर्वत्र चर्चा होत आहे.
आजचे पेट्रोल दर…महाराष्ट्रातील बहुतांश शहरातील पेट्रोलने गाठली 'शंभरी' #surajyadigital #शंभरी #Rs100 #fuel #prise #maharashtra #पेट्रोल #सुराज्यडिजिटल #Petrol pic.twitter.com/Wa5f47Xma3
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 28, 2021
भाजपच्या सत्ता काळातत इंधन दरवाढीचा आलेख चढाच राहिला आहे. मे महिन्यामध्ये सुमारे 14 वेळा इंधनाचे दर वाढले आहेत. आता पेट्रोलने शंभरी गाठली आहे. त्याचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने अनोखे फलक सबंध ठाणे शहरात लावले आहेत. या फलकांवर अच्छे दिनाच्या शुभेच्छा देऊन मोदी सरकारला मॅन ऑफ दी मॅचचा पुरस्कार दिला आहे.
समाधानी नसाल, तर बोर्डाच्या दोन परीक्षांच्या संधी; लगेच बारावीची परीक्षा, शक्य नाही https://t.co/yK335IXVNe
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 28, 2021
देशात पेट्रोल आणि डीझेलच्या किमतींमध्ये या महिन्यातील 4 तारखेनंतर आज चौदावी दरवाढ झाल्याचं पाहायला मिळालं आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
ठाणे- मुंबईत पेट्रोलनं शंभरी गाठली आहे. डीझेलची किंमत 29 पैसे प्रति लिटर वाढ झाली आहे. ठाणे- मुंबईत पेट्रोल आज 100.4 रुपये आणि 91.87 रुपये प्रति लिटर आहे. याचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने हे फलक लावले आहेत. सबंध ठाणे शहरात लावण्यात आलेल्या या फलकावर दाढीवाल्या फलंदाजाचे चित्र असून त्याने शतक पूर्ण केल्याचे नमूद केले आहे. ” मॅन ऑफ दि मॅच; पेट्रोल 100 नॉट आऊट; अच्छे दिनाच्या शुभेच्छा” असा संदेशही या फलकांवर लावण्यात आला आहे. या फलकांची ठाणे शहरात जोरदार चर्चा सुरु आहे.
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची १३८ व्या जयंती… विनम्र अभिवादन…"ने मजसी ने परत मातृभूमीला सागरा प्राण तळमळला सागरा…" #surajyadigital #सुराज्यडिजिटल #Savarkar #जयंती #अभिवादन #सावरकरhttps://t.co/Bpiop35QIX
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 28, 2021
* मॅन ऑफ दि मॅचचा पुरस्कार
गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली सबंध ठाणे शहरात फलक लावले आहेत. त्यावर एक बॅट्समॅनचे चित्र आहे. त्याला आम्ही मॅन ऑफ दि मॅचचा पुरस्कार दिला आहे. त्यावर शंभरी पार केल्याबद्दल अच्छे दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. सत्तेवर येण्यापूर्वी नरेंद्र मोदी आणि भाजपचे नेते ” बहुत हुई महँगाई की मार, अब की बार मोदी सरकार” असे ओरडत होते. मात्र, आता त्यांच्या कार्यकाळात महागाईचा उच्चांक झाला आहे. यूपीएच्या काळात पट्रोल-डिझेल कधीच एवढ महाग झाले नव्हते. त्यामुळेच केंद्रातील मोदी सरकारचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने हे फलक लावले आहेत.
मोठी दिलासादायक बातमी,महाराष्ट्रासाठी गुडन्यूज ! रिकव्हरी रेट वाढला #surajyadigital #कोरोना #recovery #maharashtra #दिलासादायक #सुराज्यडिजिटल #BIGNEWS pic.twitter.com/gmn7nJO0jq
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 28, 2021