बीड : दीड महिन्यापासून दीर भावजयीवर बलात्कार करत असल्याची घटना उघडकीस आलीय. हा प्रकार बीडच्या केज येथे घडलाय. दीड महिन्यापूर्वी पहिल्यांदा दीराने भाजवयीवर बलात्कार केला होता. त्यानंतर जीवे मारण्याची आणि व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत दीर सतत बलात्कार करत राहिला. 29 मे लाही दिराने बलात्कार केला. त्यानंतर हे सहन होत नसल्याने भावजयीने पतीला सर्व प्रकार सांगितला. यानंतर दीराविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
5G विरोधात जुही चावला कोर्टात, दूरसंचार कंपन्यांनी स्पष्ट करावं https://t.co/KxZEfDJtdp
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 1, 2021
उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये बाहेर झोपलेल्या चुलत भावजयीवर दिराने जबरदस्तीने बलात्कार केला आहे. हि घटना बीड जिल्ह्यातील केज पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडली आहे. यामध्ये पीडित महिलेला घराच्या बाजूला ओढत नेऊन तिच्या इच्छेविरुद्ध बलात्कार केला. या प्रकरणी पीडित महिलेच्या तक्रारीवरून केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
गुजरातला 1 हजार कोटी, महाराष्ट्राला तुम्हाला योग्य वाटेल तेवढे तरी द्या, रामदास आठवलेंना पवारांचा आणखी एक सल्ला https://t.co/ngphRxsK4t
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 1, 2021
25 वर्षीय चुलत भावजयीला घराच्या बाजूला ओढत नेत जबरदस्तीने इच्छेविरुद्ध बलात्कार केला. तसेच या घटनेची कुठे वाच्यता केली किंवा सांगितले तर चाकूचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच तुझा व्हिडिओ माझ्याकडे आहे. जर याबाबत कोणाला सांगितले तर हा व्हिडिओ गावभर पाठवेन. अशी धमकी देत त्याने वारंवार बलात्कार केल्याचे फिर्यादीने आपल्या तक्रारीत म्हंटले आहे.
त्याने 29 मे रोजी देखील पीडितेवर अतिप्रसंग केला होता. मागील दीड महिन्यांपासून तो दीर पीडित विवाहित चुलत भावजयीवर वारंवार बलात्कार करत होता. पीडितेला हे सगळे सहन ने झाल्याने तिने आपल्या पतीला हा सगळा प्रकार सांगितला. पीडित महिलेच्या पतीने त्याला जाब विचारला असता त्याने शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली.
मोठा निर्णय; 6 कोटी लोकांना दुसऱ्यांदा काढता येणार रक्कम https://t.co/MHlCTqIDOq
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 1, 2021
यानंतर पती- पत्नीने थेट केज पोलीस स्टेशनमध्ये जाऊन पीडित महिलेच्या तक्रारीवरून केज पोलीस ठाण्यात दिराविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
या प्रकरणात आद्यप आरोपीला अटक करण्यात आले नाही.
महाराष्ट्रात दहावीची परीक्षा घेणं अशक्य, 12 वी परीक्षा केंद्र सरकार करणार घोषणा #surajyadigital #10th #12th #सुराज्यडिजिटल #केंद्रसरकार #maharashtra #अशक्य #घोषणा pic.twitter.com/k5UoUrbcFj
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 1, 2021