सोलापूर : रणजितसिंह डिसले गुरुजी पुन्हा चर्चेत आलेत. त्यांची जागतिक बँकेने सल्लागार म्हणून नियुक्ती केली आहे. डिसले गुरुजींना याआधी ग्लोबल टीचर पुरस्कार मिळाला आहे. हा पुरस्कार मिळवणारे ते पहिलेच शिक्षक ठरले. यानंतर आता सल्लागार म्हणून 3 वर्षे ग्लोबल कोच नावाच्या कार्यक्रमात ते आपले योगदान देणार आहेत. जागतिक बँकेने जगभरातील शिक्षकांच्या सेवांतर्गत प्रशिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी हा कार्यक्रम सुरू केला आहे.
A great achievement and a big big congratulations to Shri Disale Guruji… https://t.co/f4P4H978y7
— K S Hosalikar (@Hosalikar_KS) December 4, 2020
ग्लोबल टीचर पुरस्कार मिळवणारे पहिले भारतीय शिक्षक रणजितसिंह डिसले गुरुजींची जागतिक बँकेने सल्लागार म्हणून नियुक्ती केली आहे. जून 2021 ते जून 2024 या कालावधीकरिता ही नेमणूक करण्यात आली आहे. जागतिक बँकेच्या वतीने जगभरातील शिक्षकांच्या सेवांतर्गत प्रशिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी ग्लोबल कोच नावाचा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे.
'ग्लोबल टीचर' पुरस्कार विजेते आणि महाराष्ट्राचे सुपुत्र @ranjitdisale यांची जागतिक बँकेच्या शिक्षण विषयक सल्लागार पदी नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचं मनःपूर्वक अभिनंदन! डिसले गुरुजींच्या ह्या दैदीप्यमान यशानं देशाची मान उंचावली आहे. त्यांना उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा! pic.twitter.com/YSp3qkk7Xb
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) June 3, 2021
याअंतर्गत जगभरातील मुलांच्या शैक्षणिक संपादणूक पातळीमध्ये वाढ करण्याच्या हेतूने जगभरातील शिक्षकांच्या सेवांतर्गत प्रशिक्षण कार्यक्रमात अधिक एकसूत्रता आणणे, शिक्षकांना कालसुसंगत प्रशिक्षण देणे, प्रशिक्षणाच्या माध्यमातून शिक्षकांमधील नेतृत्वगुण विकसित करणे आदी उद्दिष्टे ठरवण्यात आलेली आहेत.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
आषाढी यात्रेत विठ्ठल मंदिर बंदच, महापूजेसाठी मुख्यमंत्र्यांना निमंत्रण, उत्पन्न वाढीसाठी देवाच्या प्रतिमा तयार करून विक्री
https://t.co/EBp7IewEJy— Surajya Digital (@SurajyaDigital) June 3, 2021
ही उद्दिष्टे साध्य करण्यासाठी जगभरातील 12 व्यक्तींची सल्लागार म्हणून निवड केली आहे. या समितीच्या माध्यमातून तंत्रज्ञानावर आधारित प्रशिक्षण कार्यक्रम तयार करून 21 व्या शतकातील शिक्षक घडवण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे डिसले गुरुजींनी सांगितले.
ग्लोबल टीचर पुरस्कार मिळवणारे पहिले भारतीय शिक्षक रणजितसिंह डिसले यांच्या आणि ओघाओघाने भारत देशाच्याही शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे. डिसले गुरुजी यांच्या नावाने इटलीतील विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप अर्थात शिष्यवृत्ती दिली जाणार असल्याची माहिती नुकतीच समोर आली आहे.
प्रश्न – कंत्राट कुणाला दिलं ? उत्तर – तुझ्या बापाला, महापौर वादात…! https://t.co/2mNBc3ylxN
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 3, 2021
कार्लो मझोने- रणजित डिसले स्कॉलरशिप या नावाने 400 युरोंची ही शिष्यवृत्ती इटलीतील सॅमनिटे राज्यातील 10 विद्यार्थ्यांना दिली जाणार आहे. विद्यापीठस्तरावरील शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती मिळणार आहे. यासाठी संबंधित महाविद्यालयांच्या प्राचार्यांनी प्रस्ताव पाठवायचे आहेत. बेनव्हेंटोचे महापौर, कॅम्पानिया प्रांताचे शिक्षण अधिकारी या मुलांची निवड करणार असून, पुढील 10 वर्षे 100 मुलांना ही शिष्यवृत्ती दिली जाणार आहे.
ट्विटरवर व्हेरिफिकेशन प्रक्रिया पुन्हा सुरू, असे करा व्हेरिफिकेशन https://t.co/cVQrnjTlIk
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 3, 2021