नवी दिल्ली : देशात कोरोनामुळे महागाईही वाढत आहे. त्यातच आता भाजप नेते बृहमोहन अग्रवाल यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं. ज्यांना महागाई हे राष्ट्रीय संकट वाटत असेल तर त्यांनी खाणं पिणं सोडून द्यावं. त्यामुळे हे संकट कमी होईल, असं अग्रवाल म्हणाले. अग्रवाल हे छत्तीसगडमध्ये आमदार असून मंत्रीमंडळात नेतेही आहेत.
'या' देशात एकही मच्छर, साप किंवा सरपटणारे प्राणी सापडणार नाही https://t.co/itRwpozLxu
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 4, 2021
देशात कोरोनाचे संकट असून महागाई वाढत आहे. अशा वेळी एका भाजप नेत्याने वादग्रस्त वक्तव्य केले आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
ज्यांना महागाई राष्ट्रीय संकट वाटत असेल त्यांनी खाणे, पिणे सोडून द्यावे त्यामुळे हे संकट कमी होईल असे विधान छत्तीसगडचे आमदार बृहमोहन अग्रवाल यांनी केले आहे.
भारतातील सर्वात खराब भाषा कोणती? उत्तरामुळे गुगलने मागितली माफी; गुगलविरोधात कन्नड भाषिक आक्रमकhttps://t.co/iUdD99llNA
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 4, 2021
बृजमोहन अग्रवाल छत्तीसगमध्ये आमदार असून डॉ. रमण सिंह यांच्या मंत्रिमंडळात ते मंत्रीही होते. गुरूवारी महागाईवर मत व्यक्त करताना अग्रवाल म्हणाले की, ज्यांना ज्यांना महागाई एक राष्ट्रीय संकट वाटत असेल त्यांनी खाणे पिणे सोडून द्यावे. पेट्रोल डिझेल वापरू नये. ज्यांनी काँग्रेसला मत दिले आहे त्यांनी जरी हे काम केले तर महागाई आटोक्यात येईल असे अग्रवाल म्हणाले.
मला कळतच नाही, लग्न का करतात ? नोबेल पुरस्कार विजेती मलाला #surajyadigital #Nobel #Malala #MalalaYousafzai #सुराज्यडिजिटल #लग्न #marriage #why pic.twitter.com/lis2BI32UO
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 4, 2021