नागपूर : ज्येष्ठ नागरिक व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक नारायण दाभाडकर यांनी कोरोनाबाधित तरुणासाठी रुग्णालयाती बेड सोडली नव्हती तर त्यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना त्यांचे जावई व इतर नातेवाईकांनीच स्वत:हून रुग्णालयातून नेले होते, असा तपशील माहिती अधिकारातून प्राप्त झाला आहे.
शेतमजुराच्या मुलाची इस्रोमध्ये शास्त्रज्ञ म्हणून निवड https://t.co/sDpxPI3Fj6
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 18, 2021
दरम्यान, या तपशीलाच्या आधारावर काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी भाजपवर टीका केली आहे. भाजपने दाभाडकर यांच्या मृत्यूचा वापर संघाच्या प्रतिमा संवर्धनासाठी केल्याचा त्यांचा आरोप आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते मोहनिश जबलपुरे यांनी हा तपशील माहिती अधिकाराच्या माध्यमातून प्राप्त झाला. तो काल गुरुवारी सचिन सावंत यांनी ट्विट केला. नारायणराव दाभाडकर हे २२ एप्रिलला नागपूर महापालिकेच्या इंदिरा गांधी रुग्णालयातून घरी परतले होते.
भारतात गूगल मॅपने शोधलं एक रहस्यमय बेट https://t.co/xkvza1PPaj
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 18, 2021
त्यानंतर तीन दिवसांनी त्यांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर यासंदर्भात एक पोस्ट समाजमाध्यमांवर प्रसारित झाली होती. त्यात ‘मी आता ८४ वर्षांचा आहे. मी माझे सर्व आयुष्य जगून घेतले. मला उपचाराची गरज नाही. माझी रुग्णशय्या तुम्ही या गरजू रुग्णाला द्या आणि त्याच्यावर उपचार करा’, असे सांगून दाभाडकर घरी परतले असा उल्लेख होता.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
दाभाडकर यांची त्यागकथा या नावाने ही पोस्ट सर्वत्र पसरली होती. मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्यासह भाजपच्या अनेक नेत्यांनी दाभाडकर त्यांच्या त्यागाचे कौतुक केले होते. दरम्यान, रुग्णालयानेच त्याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केल्याने उलटसुटल चर्चेला तोंड फुटले होते.
साबरमती नदीतील सर्व नमुने कोरोना बाधित https://t.co/eqZgB9MXE0
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 18, 2021
* स्वत:च्या जबाबदारीवर घरी जाण्याची लेखी परवानगी मागितली
मोहनिश जबलपुरे यांना रुग्णालयातून प्राप्त माहितीमध्ये दाभाडकर यांच्या नातेवाईकांनी रुग्णालयाला दिलेल्या पत्राचा समावेश आहे. त्यात दाभाडकर यांच्या शरीरातील प्राणवायूची पातळी खालावलेली असतानाही त्यांनी रुग्णालय सोडण्याचा निर्णय का घेतला यामागचे कारण नमूद आहे. ‘रुग्णालयात व्हेंटिलेटरची सुविधा नव्हती व रुग्णाची स्थिती गंभीर असल्याने तेथील डॉक्टरांनी इतर इस्पितळात नेण्याचा सल्ला दिला होता. तेव्हा दाभाडकर यांनी व त्यांच्या जावयाने स्वत:च्या जबाबदारीवर घरी जाण्याची लेखी परवानगी मागितली’, असेही त्या पत्रातून स्पष्ट होते.
स्व नारायण दाभाडकर यांच्या मृत्यूचा उपयोग संघाच्या प्रतिमा संवर्धनासाठी करण्याचा अश्लाघ्य प्रकार भाजपाने केला. यात मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री @ChouhanShivraj व अनेक भाजपा संघाचे नेते सहभागी झाले. वस्तुस्थिती माहिती अधिकारात समोर आली आहे. हॉस्पिटलमध्ये व्हेंटिलेटरची सुविधा नव्हती pic.twitter.com/M4ykmiGQb3
— Sachin Sawant सचिन सावंत (@sachin_inc) June 17, 2021
विशेष म्हणजे, या पत्रात कोणत्याही तरुणासाठी किंवा इतर कोणासाठीही रुग्णशय्या सोडल्याचा उल्लेख नाही, याकडे सावंत यांनी त्यांच्या ट्विटमध्ये लक्ष वेधले आहे. मृत्यूचे भांडवल करायचे नव्हते आम्हाला त्यांच्या मृत्यूचे भांडवल करायचे नाही. याआधी देखील चित्रफितीद्वारे हे स्पष्ट केले होते. भांडवल करायचे नव्हते म्हणून रुग्णालयाला दिलेल्या माहितीत आम्ही तसे काही नमूद केले नाही. परंतु आपला प्राणवायू काढून इतर कुणाला देण्यासारखा त्याग नाही. दाभाडकर समाजासाठी आदर्श आहेत.
या माहिती नंतरही स्व नारायण दाभाडकर यांच्याबद्दलचा आमच्या मनातील आदर कमी होणार नाही. त्यांना राजकारणात ओढणे हे अयोग्य आहे. त्यांनी जरी असे पाऊल उचलले असते तरी त्याचा संघाशी संबंध जोडणे हे उचित नव्हते. स्व नारायण दाभाडकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली 🙏
— Sachin Sawant सचिन सावंत (@sachin_inc) June 17, 2021