मुंबई : महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनमध्ये (MMRC) महत्त्वाच्या पदांवर भरती होत आहे. इंजिनीयरिंगचं शिक्षण घेतलेल्यांना सरकारी नोकरी मिळवण्यासाठी संधी या निमित्तानं उपलब्ध झाली आहे. जर तुम्ही बीई किंवा बीटेकची पदवी घेतली असेल तर तुम्ही मुंबई मेट्रोमधील नोकऱ्यांसाठी अर्ज करू शकता. व्यवस्थापक आणि सहव्यवस्थापक पदांसाठी ही भरती होत आहे.
दिलीप मानेंच्या निवासस्थानी जयंतराव, धनंजय मुंडेंचा नाश्ता; विधान परिषद निवडणुकीच्या हालचाली https://t.co/10uxc5LlNN
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 24, 2021
या पदांसाठी उमेदवारांना ऑफलाईन अर्ज करावा लागेल. या पदांसाठी कोणतीही लेखी परीक्षा द्यावी लागणार नाही. अर्जदार शॉर्ट लिस्ट करून त्यांना मुलाखतीसाठी बोलावलं जाईल. अर्जात नमूद केलेल्या ईमेल आयडीवर मुलाखतीची माहिती पाठवण्यात येईल. यानंतर वैद्यकीय चाचणी घेतली जाईल. मग निवड प्रक्रिया पूर्ण होईल.
जीभ आहे की काय; तरुणाच्या लांब जीभेचा रेकॉर्ड, आगामी काय आहे लक्ष्य ?https://t.co/k0beXUiau2
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 24, 2021
व्यवस्थापक पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचं वय कमाल ४० वर्षे असावं. तर सहाय्यक व्यवस्थापक पदासाठी अर्ज करणाऱ्या व्यक्तीचं वय कमाल ३५ वर्ष असावं. अर्जदारानं एआयसीटीई (एआयसीटीई) किंवा यूजीसीची (यूजीसी) मान्यता असलेल्या कोणत्याही विद्यापीठातून संबंधित शाखेमध्ये बीई किंवा बीटेक केलेलं असावं.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
पुण्यात निर्बंध जैसे थे! शाळा-कॉलेज 15 जुलैपर्यंत बंद https://t.co/NITuOYN58h
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 25, 2021
या पदांसाठी ऑफलाईन अर्ज करावा लागेल. अर्ज नोटिफिकेशनसोबत देण्यात आला आहे. तो डाऊनलोड करून त्याची प्रिंट काढावी. तो व्यवस्थित भरून १३ जुलै २०२१ च्या आधी मेट्रो भवन, महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड, व्हीआयपी रोड, दिक्षाभूमीच्या समोर, रामदेशपथ, नागपूर- ४४००१० या पत्त्यावर पाठवावा.
मुंबई मेट्रोसाठी होणारी भरती नागपूर मेट्रो रेल प्रोजेक्टच्या माध्यमातून होत आहे. याबद्दलचं नोटिफिकेशन mahametro.org वर जारी करण्यात आलं आहे. जाणून घ्या संपूर्ण प्रवेश प्रक्रिया-
होंडा आणणार जबरदस्त इलेक्ट्रॉनिक स्कूटर, पहा फिचर्स https://t.co/vIY7xrK6Dw
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 24, 2021
* कोणत्या पदांसाठी भरती ?
व्यवस्थापक (टेलिकॉम) – 2 पदं
व्यवस्थापक (सिग्नल) – 2 पदं
व्यवस्थापक (आईटी) – 1 पदं
व्यवस्थापक (ओएचई) – 1 पद
व्यवस्थापक (पीएसआई) – 1 पद
सहाय्यक व्यवस्थापक (सिस्टम ऍनालिस्ट आईटी/टेलिकॉम) – 2 पदं
सहाय्यक व्यवस्थापक (सिग्नल) – 2 पदं
सहाय्यक व्यवस्थापक (रॉलिंग स्टॉक) – 1 पद
सहाय्यक व्यवस्थापक (ओएचई) – 2 पदं
सहाय्यक व्यवस्थापक (ऊर्जा पुरवठा सप्लाई) – 2 पदं
सहाय्यक व्यवस्थापक (टेलिकॉम अँड एएफसी) – 2 पदं