वेळापूर : पंढरपूर विधानसभेच्या निवडणुकीनंतर खासदार शरद पवार हे सोलापूर जिल्ह्यातील वेळापूर येथे वधू – वराला आशीर्वाद देण्यासाठी आले होते. शरद पवारांनी वधू वरांना शुभाशीर्वाद देऊन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळ उपस्थित जिल्ह्यातील नेत्यांनी अर्धा तास चर्चा केली.
यावेळी त्यांनी वधू-वरास शुभेच्छा दिल्या. यावेळी उत्तम जानकर यांनी मुलगी डॉक्टर असल्याची माहिती दिली. त्यावर शरद पवारांनी मुलीला प्रॅक्टिस करणार ना असा प्रश्न उपस्थित केला. तसेच उत्तम जानकर यांच्या मुलाला मुलीला प्रॅक्टिस करु देण्याची सूचना दिली. यावर नवरदेव जीवन जानकर याने आपला व्यवसाय असल्याची माहिती शरद पवार यांना दिली.
उत्तम जानकर हे सोलापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे मोठे नेते आहे. त्यांनी माळशिरस मतदारसंघातून 2019 साठी राष्ट्रवादी काँग्रेस निवडणूक लढवली होती. त्यावेळी भाजप आमदार राम सातपुते यांच्या कडून निसटता पराभव झाला होता.
नागपुरात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली ओबीसी आरक्षणासाठी आंदोलन झाले. यावेळी पोलिसांनी त्यांच्यासह भाजपच्या काही नेत्यांना ताब्यात घेतले. #surajyadigital #भाजपा #DevendraFadnavis #nagpur #सुराज्यडिजिटल #OBCReservationhttps://t.co/OFdFI1v3gM
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 26, 2021
राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्ह्याचे नेते उत्तमराव जानकर यांचे चिरंजीव जीवन जानकर आणि जत येथील सुभाषराव माने पाटील यांची कन्या डाॅ. स्नेहल पाटील यांचा आज शनिवारी विवाह सोहळा संपन्न झाला. या विवाह सोहळ्यास वेळ काढून दुपारी २.३० वाजता हेलिकाॅप्टरने माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी हजेरी लावून वधू-वरांना आशीर्वाद दिले.
महाराष्ट्रातभर पावसाची शक्यता, सोलापुरात जोरदार पाऊस #rain #surajyadigital #पाऊस #solapur #maharashtra #सुराज्यडिजिटल pic.twitter.com/gghojsQHa5
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 26, 2021
शरद पवार यांचे आगमन गरुड बंगला येथे दोन वाजून 30 मिनिटांनी आगमन झाले. यावेळी उत्तमराव जानकर व पत्नी सौ विमलताई जानकर यांनी त्यांचे स्वागत केले. शरद पवारांशी गरुड बंगल्यावर ३० मिनिट चर्चा झाली. यावेळी सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे, जिल्हा अध्यक्ष बळीराम साठे, आमदार बबनदादा शिंदे, आमदार संजयमामा शिंदे, आमदार यशवंत माने,
बायकोने जरी मारलं तरी मोदींनाच जबाबदार धरतील – फडणवीस, देवेंद्र फडणवीसांना पोलिसांनी घेतले ताब्यात https://t.co/UZD8ht7xje
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 26, 2021
माजी आमदार दिपकआबा साळुंखे, उमेश पाटील, फत्तेसिंह माने पाटील, काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष प्रकाश पाटील, पांडुरंग माने देशमुख, माजी उपसभापती मच्छिंद्र ठवरे, शिवाजीराजे कांबळे, जि.प. सदस्य बाळासाहेब धाईंजे, बाळासाहेब लवटे, उपसरपंच जावेद मुलाणी, के पी काळे पाटील, अजय सकट यांच्यासह नातेवाईक मान्यवर उपस्थित होते.
विवाह सोहळा शासकीय नियमांचे पालन करून साध्या पध्दतीने सोशल डिस्टन्सिग ठेवून संपन्न झाला. कोरोना परिस्थिती असल्याने या विवाह सोहळ्यास मोजक्याच राजकीय मंडळींना आमंञण दिले होते. वधु वरांना आशीर्वाद देण्यासाठी सोलापुर जिल्हातून विविध राजकिय पक्षांचे राजकिय नेते, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य , विविध संस्थांचे पदाधिकारी, विविध गावचे सरपंच यांनी दिवसभरात उपस्थिती लावली.
सोलापूर : माकपाच्यावतीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं केली. शेतीवाचवा, लोकशाही वाचवा, देशवाचवा अशा घोषणा देण्यात आल्या. पदाधिकाऱ्यांना पोलीसांनी घोषणाबाजीनंतर ताब्यात घेतलं. #surajyadigital #माकप #आंदोलन #सुराज्यडिजिटलhttps://t.co/P4j5zrJKEj
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 26, 2021