मुंबई : 3 कोटी लोकांना कोरोना लस देणारा देशातील पहिला राज्य महाराष्ट्र ठरला आहे. राज्यात आज दुपारी 2 वाजेपर्यंत 3,00,27,217 जणांना कोरोना लस देण्यात आली. राज्याच्या आरोग्य विभागाचे अधिकारी डॉ. प्रदीप व्यास यांनी ही माहिती दिली. दरम्यान, महाराष्ट्राची लोकसंख्या सुमारे 11.42 कोटी इतकी आहे.
जानकर परिवाराच्या विवाह सोहळ्यास शरद पवार यांची हजेरी, जानकरांच्या दुसर्या पिढीला शरद पवारांचा आशीर्वाद https://t.co/8sDergMPxX
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 26, 2021
कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेत महाराष्ट्र दररोज उच्चांकी कामगिरी नोंदवत आहे. आज देखील त्यात अजून एका विक्रमाची भर पडली असून शनिवारी सायंकाळी सातपर्यंत दिवसभरात 7 लाख 26 हजार 588 नागरिकांना लस देण्यात आली. एकाच दिवशी एवढ्या मोठ्या प्रमाणावर लस देण्याची आतापर्यंतची ही सर्वोच्च आकडेवारी आहे. राज्यात आतापर्यंत 3 कोटी 9 लाख 79 हजार 460 लसीच्या मात्रा देण्यात आल्या आहेत.
एकाच दिवशी एवढ्या मोठ्या प्रमाणावर लस देण्याची आतापर्यंतची ही सर्वोच्च आकडेवारी आहे. राज्यात आतापर्यंत ३ कोटी ९ लाख ७९ हजार ४६० लसीच्या मात्रा देण्यात आल्या आहेत.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
खायला मटण मिळालं नाही म्हणून नवरदेव भडकला, लग्नातूनच गुपचूप पसार, गावातच मुक्काम करुन दुसरी सोबत लग्न https://t.co/4DxgNAXPby
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 26, 2021
लसीकरणात सातत्य टिकवत महाराष्ट्र देशात अग्रस्थानी आहे. ही लक्षणीय कामगिरी करणाऱ्या आरोग्य अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे कौतुक मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केले आहे.
गेल्या काही दिवसांपासून राज्यात लसीकरण मोहिमेला वेग आला असून त्यामुळे लक्षणीय कामगिरीची नोंद होत आहे. दर दिवशी आधीच्या दिवसाच्या विक्रमी कामगिरीपेक्षा सरस कामाची नोंद होत आहे. काल राज्याने ३ कोटी लस मात्रांचा टप्पा ओलांडला तर आज दिवसभरात ७ लाखांहून अधिक लस देण्याची विक्रमी नोंद महाराष्ट्राच्या नावाने नोंदविण्यात आली असल्याचे आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी सांगितले.
पुण्यात सोमवारपासून नवे निर्बंध; काय सुरु काय बंद ?, पुणे शहरात एकूण रुग्णसंख्या पावणे पाच लाखांच्या वरhttps://t.co/IsmlHONmXU
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 26, 2021
* 12 ते 18 वयोगटातील मुलांसांठी कोरोना लस लवकरच उपलब्ध होणार
12 ते 18 वर्षे या वयोगटातील मुलांना लवकरच कोरोना लस मिळणार आहे. कारण, या वयोगटातील मुलांसाठीच्या झायडस कॅडिलाच्या लसीला मंजुरी देण्यात येणार असल्याचे मोदी सरकारने प्रतिज्ञापत्रात सांगितले. या लसीची 12 ते 18 वर्षे या वयोगटातील मुलांवरील वैद्यकीय चाचणी पूर्ण झाली आहे. तसेच, भारत बायोटेकच्या लसीची 2 ते 18 वर्षांवरील मुलांवर वैद्यकीय चाचणी सुरू करण्यात आली आहे.