मोहोळ : केंद्र सरकारच्या पेट्रोल व डिझेल दरवाढीमुळे सर्वसामान्यांचे हाल होत असून केंद्र शासनाच्या या धोरणाच्या विरोधात जिल्हा युवासेना आक्रमक होऊन सोलापूर जिल्हा युवासेना च्या वतीने मोहोळ येथे बैलगाडी मोर्चा काढला. यावेळी केंद्र सरकारच्या महागाईयुक्त धोरणाचा निषेध करण्यात आला.
केंद्र सरकारकडून देशभरात दररोज होणाऱ्या पेट्रोल व डिझेलच्या दरवाढीने सर्वसामान्य माणूस मेटाकुटीला आला असून त्यांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. इंधन दरवाढीचा परिणाम प्रत्येक गोष्टीवर होत असून सर्वसामान्यांना याची झळ बसत आहे. सर्व स्तरातील व्यक्तींचे आर्थिक नियोजन पूर्ण कोलमडले आहे. केंद्रातील सरकार लोकांना खोटी आश्वासने देऊन सत्तेवर आले. मात्र त्यांनी जनतेला दिलेल्या शब्दांचा पूर्णपणे विसर पडला आहे.
या केंद्र शासनाच्या खोटेपणाच्या विरोधात युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे, युवासेना सचिव वरूण सरदेसाई यांच्या आदेशानुसार शिवसेना जिल्हा प्रमुख गणेश वानकर यांच्या सुचनेनुसार व युवासेना सहसचिव विपुल पिंगळे यांच्या प्रमुख उपस्थिती मोहोळमध्ये आंदोलन केले.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
सोलापूर जिल्हा युवा सेनेच्या वतीने युवा सेना जिल्हाप्रमुख महेश देशमुख यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यात इंधन दरवाढीविरोधात सायकल रॅलीचे आयोजन केले होते. रविवारी मोहोळ येथे बैलगाडी मोर्चा काढून केंद्र सरकारच्या महागाई युक्त धोरणाचा निषेध करण्यात आला. मोहोळ शहरातील मुख्य रस्त्यावर बैलगाडी मोर्चा सह सायकल रॅली काढून केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली.
या आंदोलनात युवासेना राज्य सहसचिव विपुल पिंगळे, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष दिपक गायकवाड, माजी उपसभापती बाळासाहेब गायकवाड, जिल्हा उपप्रमुख लखन शिंदे, शिवसेना तालुका प्रमुख अशोक भोसले, माजी नगरसेवक महादेव गोडसे, माजी नगरसेवक चंद्रकांत गोडसे, माजी नगरसेवक सत्यवान देशमुख, तालुकाप्रमुख राजरत्न गायकवाड, रणजीत गायकवाड, संजय काकडे, संजय काळे, शिवाजी पासले, भीमराव मुळे, बंडू मुळे, सचिन सुरवसे, सचिन उन्हाळे, सचिन जाधव, गणेश नाईकनवरे, संग्राम जगताप आदी उपस्थित होते.
* रेल्वे पोलिस क्वार्टरमध्ये सव्वा लाखाची घरफोडी