मुंबई : भारताचा माजी क्रिकेटपटू युवराज सिंग पुन्हा एकदा क्रिकेटच्या मैदानात खेळताना दिसणार आहे. युवराजनेच इन्स्टाग्रामवर पोस्ट करत याची माहिती दिली. ‘देव तुमचे नशीब ठरवतो ! सर्व चाहत्यांच्या इच्छा आणि मागणीनुसार मी फेब्रुवारीमध्ये पुन्हा खेळपट्टीवर येईन! अशी भावना आहे ! त्यासाठी तुमच्या प्रेमाबद्दल धन्यवाद आणि आपल्या शुभेच्छा माझ्यासाठी खूप महत्त्वाच्या आहेत’, असं युवराजने म्हटलं.
भारतीय संघाचा माजी अष्टपैलू खेळाडू युवराज सिंग पुन्हा मैदानात उतरणार आहे. चाहत्यांच्या मागणी लक्षात घेऊन पुन्हा पीचवर उतरण्याचा निर्णय घेत असल्याचं युवराज सिंगनं इन्स्टाग्राम पोस्टमध्ये म्हटलं आहे. आपण कधी मैदानात उतरणार तेदेखील युवराजनं पोस्टमध्ये नमूद केलं आहे. मात्र त्यानं कोणत्या मालिकेत किंवा सामन्यात खेळणार त्याबद्दल माहिती दिलेली नाही.
‘देव तुमचं नशीब लिहित असतो. लोकांची मागणी लक्षात घेता मी फेब्रुवारीत क्रिकेटच्या मैदानात परतेन अशी आशा आहे. यापेक्षा छान भावना असूच शकत नाही. तुम्ही दिलेल्या प्रेमाबद्दल आणि शुभेच्छांबद्दल आभार. या गोष्टी माझ्यासाठी महत्त्वाच्या आहेत. आमच्या संघाला पाठिंबा देत राहा. कारण एक खरा चाहता अवघड काळात संघाची साथ सोडत नाही. जय हिंद!’, असं युवराजनं इन्स्टाग्राम पोस्टमध्ये म्हटलं आहे.
युवराज सिंग त्यावेळी संघात डाव्या हाताचा फलंदाज होता ज्याने जगातील अव्वल फलंदाजांपैकी एक म्हणून आपले स्थान निर्माण केले होते, तो संघात असो अथवा नसो त्याच्या मागे त्याच्या सर्वोत्तम खेळाचा इतिहास होता, अनेकांचा असा विश्वास होता की युवराज अजूनही खेळू शकेल. त्यावेळी आणखी एक मालिका युवराज खेळेल आणि मग आपली निवृत्ती घोषित करेल असच साऱ्यांना वाटलं होतं.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
पण दुर्दैवाने युवराज पुन्हा भारताच्या निळ्या जर्सीत चाहत्यांना पाहायला मिळालाच नाही आणि त्यानंतर लगेचच त्याने देशांतर्गत क्रिकेटमधूनही आपली निवृत्ती जाहीर केली. पुढे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडून परवानगी मिळाल्यानंतर भारताच्या या हार्ड हिट फलंदाजाने जगभरातील T-20 लीगमध्ये भाग घेतला आणि यावर्षी रोड सेफ्टी टी-20 मालिकेतही त्याने आपले उत्तम फलंदाजीचे कौशल्य दाखवले.
युवराज सिंगनं त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. २०१७ मध्ये युवराजनं इंग्लंडविरुद्ध कटकमध्ये १५० धावांची शानदार खेळी केली होती. त्या सामन्यात युवीनं १२७ चेंडूंत २१ चौकार आणि ३ षटकार लगावले होते. त्याच सामन्यात महेंद्रसिंग धोनीनं १२२ चेंडूंमध्ये १३४ धावा केल्या होत्या.
युवराजनं फेब्रुवारीत आपण परतणार असल्याची घोषणा केली आहे. मात्र त्यानं मालिकेचं नाव सांगितलेलं नाही. रस्ते सुरक्षा मालिकेत युवराज खेळू शकतो, असा कयास आहे. गेल्या वेळेसही युवराजनं या मालिकेत सहभाग घेतला होता. त्यात युवराजची कामगिरी चांगली झाली होती. या मालिकेत युवराज सोबतच सचिन तेंडुलकर, विरेंद्र सेहवाग, मुनाफ पटेल, मोहम्मद कैफ यांचाही सहभाग असतो. जगातील माजी दिग्गज क्रिकेटपटूदेखील या मालिकेत पाहायला मिळतात.
पण आता युवराज भारतासाठी किंवा T-20 लीगमध्ये खेळण्यासाठी परतणार आहे की नाही हे अद्याप स्पष्ट नसले तरी, क्रिकेटच्या खेळपट्टीवर पुन्हा एकदा आपल्या आवडत्या स्टार फलंदाजाला पाहण्याची चाहत्यांना उत्सुकता लागली आहे.