सोलापूर : विठ्ठल भक्तांसाठी खुशखबर आहे. कोरोना नियमांमुळे गेल्या दीड वर्षात पंढरपुरमध्ये सहा मोठ्या यात्रा झालेल्या नाहीत. या काळात कोट्यवधी भाविकांना विठ्ठलाचे दर्शन घेता आले नाही. मात्र, 20 महिन्यांनंतर आता विठुरायाची पंढरी वारकऱ्यांनी गजबजणार आहे. कार्तिकी यात्रा भरविण्यास परवानगी मिळाली आहे. यामुळे वारकरी संप्रदाय आणि विठ्ठल भक्तांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे.
कोरोनाच्या लॉकडाऊन आणि नियमांमुळे गेल्या दीड वर्षात पंढरपूरमध्ये सहा मोठ्या यात्रा झालेल्या नाहीत. यामुळे वारकरी वारीसाठी व्याकुळ झाला होता. या काळात कोट्यवधी भाविकांना विठ्ठलाचे दर्शन घेता आले नाही. मात्र, आता विठ्ठल भक्तांसाठी यात्रेची आनंदाची बातमी आहे. 20 महिन्यांनंतर आता विठुरायाची पंढरी वारकऱ्यांनी गजबजणार आहे. वारकरी संप्रदायासाठी आषाढी कार्तिकी हा दिवाळी सणाएवढाच महत्वाचा असतो.
कार्तिकी यात्रा भरविण्यास जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी परवानगी दिली आहे. प्रांताधिकारी गजानन गुरव यांनी सादर केलेला प्रस्ताव आणि मंदिर समितीने यात्रा भरविण्यास दाखवलेली अनकुलता यामुळे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी कार्तिकी यात्रा भरविण्यास मान्यता दिली आहे. सध्या देशासोबतच राज्यातही कोरोनाचा प्रसार कमी झाल्याचं पाहायला मिळत आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
याच पार्श्वभूमीवर कोरोनाचे सर्व नियम आणि अटी पाळून ही यात्रा भरविण्यास परवानगी देण्यात आली आहे. यामुळे वारकरी संप्रदाय आणि विठ्ठल भक्तांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले. तब्बल दीड वर्षानंतर विठ्ठल भक्तांना विठुरायाचं दर्शन घेता येणार आहे.
उपमुख्यमंत्री अजित पावर यांच्या हस्ते महापुजा, भाविकांचे दर्शन, नैवेद्य, रथोत्सव, महाद्वारकाला , पंढरपूरमध्ये येणाऱ्या दिंड्यांचे नियोजन, मठामध्ये उतरणाऱ्या भाविकांसाठीचे नियोजन, वाळवंटातील परंपरा, स्वच्छता, आरोग्य व पाणीपुरवठा याबद्दल सविस्तर सूचना आदेशात देण्यात आले आहेत. यात्रा भरविण्यास परवानगी देण्यात आल्याने पंढरपूरच्या अर्थचक्राला पुन्हा एकदा चालना मिळणार आहे. या निर्णयासाठी व्यापारी कमिटीने जिल्हाधिका-यांचे आभार मानले आहेत.
कार्तिकी यात्रेसाठी येणाऱ्या जास्तीतजास्त भाविकांना विठुरायाच्या दर्शनाचा लाभ देण्यासाठी काल शनिवारपासून देवाचे राजोपचार बंद करून 24 तास दर्शन व्यवस्था सुरु केली आहे. काल शनिवारी पहिल्यांदाच संध्याकाळी धुपारतीनंतर विठ्ठल रुक्मिणीचा पलंग काढण्यात आला आहे. देवाचा पलंग निघतो म्हणजेच, देवाची रात्रीची विश्रांती बंद होत असते. आषाढी आणि कार्तिकी यात्रेसाठी राज्यभरातून लाखो भाविक पंढरपूरमध्ये येत असतात
यातील जास्तीतजास्त भाविकांना देवाच्या दर्शनाचा लाभ मिळावा यासाठी मंदिर दर्शनासाठी 24 तास खुले ठेवण्याची परंपरा आहे. त्यानुसार विठुरायाच्या आणि रुक्मिणी मातेच्या शेजघरातील पलंग काढून ठेवण्यात येतो. यामुळे देवाची झोप बंद होते अशी प्रथा आहे. गेल्या दोन वर्षांपासून कोरोनामुळे पलंग निघत होता, मंदिरही 24 तास खुले राहायचे, मात्र मंदिरात भाविकांना प्रवेश नसायचा. यंदा कार्तिकी यात्रा होणार असल्याने कार्तिकी यात्रा काळात आजपासून 24 नोव्हेंबरपर्यंत लाखो भाविकांना 24 तास दर्शन मिळणार आहे.