कोल्हापूर : अमेरिकेच्या न्यूजर्सी भागातील होपवेल टाउनशिप येथे पार पडलेल्या निवडणुकीत भारतीय वंशाच्या उर्मिला अर्जुनवाडकर यांनी यश मिळवले आहे. होपवेल टाउनशिपच्या तीनशे वर्षांच्या इतिहासात पहिल्यांच एक भारतीय वंशांची महिला नगरसेवक म्हणून पदभार स्विकारणार आहेत.
भारतीय वंशाच्या कमला हॅरिश सध्या अमेरिकेच्या उपराष्ट्रपती आहेत. तसेच अन्य काही भारतीय वंशाच्या नागरिकांची महत्त्वांच्या पदावर वर्णी लागली आहे. यानंतर आता महाराष्ट्र आणि कोल्हापूरकरांच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवणारी ही बातमी समोर आली आहे.
होपवेल टाउनशिपच्या 300 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच एक भारतीय वंशाची महिला नगरसेवक म्हणून पदभार स्विकारणार आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
नागरिकांनी विश्वास ठेवून निवडून दिल्याने उर्मिला यांनी मतदारांचे मनापासून आभार मानले आहेत. त्या मूळच्या कोल्हापूर जिल्ह्यातील जयसिंगपूर येथील रहिवासी आहेत. त्याचं शिक्षण जयसिंगपूर आणि सांगलीत पूर्ण झालं आहे.
उर्मिला वाडकर उर्फ विवाहानंतरच्या ऊर्मिला पुरंदरे यांनी त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार एडवर्ड एम. जॅकोवस्की यांचा एक हजाराच्या मताधिक्यानी पराभव केला आहे. ‘होपवेल टाऊनशिप’च्या तीनशे वर्षांच्या इतिहासात भारतीय वंशाची पहिलीच नगरसेविका होण्याचा मानही ऊर्मिला यांनी पटकावला आहे.
या यशाबद्दल बोलताना ऊर्मिला म्हणाल्या, की आपण वीस वर्षांहून अधिक काळ या भागात राहत आहोत. या भागातील मतदारांनी माझ्यावर विश्वास ठेवत निवडून दिल्याने मी खूप आनंदी आहे. मी त्यांची आभारी आहे. मी या भागाच्या मूल्यात्मक विकासासाठी सतत प्रयत्नशील राहील. उर्मिला यांचे शिक्षण जयसिंगपूर आणि सांगली मध्ये झाले. सध्या त्यांचे वास्तव्य होपवेल येथे आहेत.