मुंबई : महाराष्ट्रात आयात केल्या जाणाऱ्या विदेशी स्कॉच-व्हिस्कीच्या उत्पादन शुल्कात तब्बल 50 टक्क्यांची कपात करण्यात आली आहे. त्यामुळे आता याच्या किमती इतर राज्याच्या बरोबरीत येणार आहेत.
उत्पादन शुल्क 300 टक्क्यांवरून 150 टक्के करण्यात आले आहे. यामुळे सरकारला मिळणारे महसूल वाढून ते 250 कोटींपर्यंत जाईल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
विदेशी स्कॉचला मात्र 50 करमुक्ती देण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला आहे. महाराष्ट्र सरकारने आयात (इम्पोर्टेड) केलेल्या स्कॉच व्हिस्कीवरील उत्पादन शुल्कात 50 टक्क्यांनी कपात केली आहे. त्यामुळे राज्यातील त्याची किंमत इतर राज्यांच्या बरोबरीने होईल.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
एका वरिष्ठ अधिकाऱ्याने ही माहिती दिली. “स्कॉच व्हिस्कीवरील उत्पादन शुल्क उत्पादन खर्चाच्या 300 वरून 150 टक्क्यांपर्यंत कमी करण्यात आले आहे,” असे अधिकारी म्हणाले आहेत. यासंदर्भातील अधिसूचना गुरुवारी जारी करण्यात आल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.
आयात केलेल्या स्कॉचच्या विक्रीतून महाराष्ट्र सरकारला वार्षिक 100 कोटी रुपयांचा महसूल मिळतो. या कपातीमुळे सरकारचा महसूल 250 कोटी रुपयांपर्यंत वाढण्याची अपेक्षा आहे कारण एक लाख बाटल्यांवरून 2.5 लाख बाटल्यांची विक्री वाढणार आहे.
शुल्कात कपात केल्यामुळे इतर राज्यांतून होणारी स्कॉचची तस्करी आणि बनावट दारूच्या विक्रीलाही आळा बसणार आहे. उत्पादन शुल्कात कपात केल्याने महाराष्ट्रात आयात होणाऱ्या व्हिस्कीच्या किमती कमी झाल्या आहेत. त्यामुळे राज्याच्या महसुलात वाढ होईल.
बातमीनुसार, सध्या एका दिवसात 1 लाख बाटल्या विकल्या जातात, शुल्क कमी केल्यामुळे बाटल्यांची विक्री अडीच लाखांवर पोहोचू शकते.