सातारा / सांगली : साताऱ्यात राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला आहे. सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत आमदार शशिकांत शिंदेंचा पराभव झाला आहे. या निवडणुकीत ज्ञानदेव रांजणे यांनी विजय मिळवला.
शशिकांत शिंदे यांना २४ मतं मिळाली असून २५ मतं घेत रांजणेंनी विजय मिळवला आहे. २१ जागांसाठी ही निवडणूक होत असून १० जागा बिनविरोध झाल्या आहेत.
सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीने भाजपचा दारुण पराभव केला. २१ जागांपैकी १७ जागांवर दणदणीत विजय मिळवत जिल्हा मध्यवर्ती बँकेत महाविकास आघाडीमधील घटक पक्षांनी वर्चस्व मिळवले. तर भाजपाला अवघ्या चार जागा मिळाल्या आहेत.
सातारा जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शशिकांत शिंदे यांचा पराभव झाला. यानंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आपल्याच पक्षाच्या कार्यालयावर दगडफेक करुन राडा घातला. यानंतर शशिकांत शिंदे म्हणाले की, ‘माझ्या पराभवामागे फार मोठं कारस्थान होतं, ते येत्या काळात समोर येईल, माझा गाफीलपणा मला नडला, त्यामुळे माझा पराभव झाला’.
सातारा व सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकाचे निवडणूक निकाल हाती घेत असून या ९ निवडणुकीत अपेक्षेप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीची सत्ता आली असली तरी सातार जिल्हा बँकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे आमदार व माजी मंत्री शशिकांत शिंदे, गृहराज्यमंत्री व शिवसेना नेते शंभूराजे देसाई यांचा पराभव झालायं. तर सहकार मंत्री या बाळासाहेब पाटील कराडमधून विजयी झालेत. शशिकांत शिंदे यांच्या पराभवानंतर राष्ट्रवादीत संघर्ष निर्माण झाला असून शिंदे समर्थक कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयावर दगडफेक करून कार्यालयाची तोडफोड केली आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
सातारा जिल्हा बँकेत यापूर्वीच राष्ट्रवादी प्रणीत पॅनलच्या ११ जागा बिनविरोध आल्यात. मात्र, मतदान झालेल्या काही ठिकाणचे निकाल धक्कादायक आहेत. गृहराज्यमंत्री शंभूराजे देसाई राष्ट्रवादी पॅनल विरोधात होते. त्यांचा पाटणमधून सत्यजीत पाटणकर यांनी पराभव केला. शरद पवारांचे विश्वासू अशी ओळख असलेले माजी मंत्री आ. शशिकांत शिंदे यांचा फक्त एक मताने पराभव झाला. त्यांच्या विरोधात विजयी झालेले ज्ञानदेव रांजणे आ. शिवेंद्रराजे यांचे समर्थक आहेत. चुरशीच्या लढतीत सहकार मंत्री बाळासाहेब पाटील भाजपाच्या मदतीने विजयी झालेत.
खटाव मतदारसंघात माजी आ. प्रभाकर घार्गे यांनी जेलमध्ये राहून राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा पराभव केला. त्यांची उमेदवारी स्वतः अजित पवारांनी ठरवली होती. शशिकांत शिंदे यांचा पराभव होताच संतप्त कार्यकत्यांनी राष्ट्रवादीच्या कार्यालयावर दगडफेक केली. शरद पवार, अजित पवारांनी सांगूनही आमच्या नेत्याचा खिंडीत गाठून पराभव झाला. या राष्ट्रवादीचे नेतेच कारणीभूत आहेत. शिंदे यांचे नेहमीच खच्चीकरण होतो, असा आरोपही त्यांनी केला.
दरम्यान अजित पवारांचा होणारा आजचा सातारा दौरा रद्द झाला आहे. सांगली जिल्हा बँकेच्या निवडणुकीत अपेक्षेप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे पॅनलने सोसायटी मतदार संघातील ७ पैकी ६ जागा जिंकल्यात मात्र येथे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आ. विक्रम सावंत यांचा जत मधून भाजपा उमेदवाराने धक्कादायक पराभव केलाय.
* अमरावतीकरांना दिलासा; बाजारपेठ सकाळी ७ ते रात्री ९ वाजेपर्यंत सुरु
अमरावती : अमरावतीकरांना आजपासून संचारबंदीतून मोठा दिलासा मिळत आहे. आजपासून सकाळी ७ ते रात्री ९ वाजेपर्यंत संपूर्ण बाजारपेठ उघडण्याची मुभा देण्यात आली आहे. तर रात्री ९ ते दुसऱ्या दिवशी सकाळी ७ वाजेपर्यंत संचारबंदी असणार आहे. म्हणजे अमरावती शहरात घडलेल्या हिंसक घटनांच्या अनुषंगाने लागू करण्यात
आलेली संचारबंदी आता केवळ रात्रीच राहणार आहे.