कानपूर : कसोटीदरम्यान गुटखा खात असल्याचा एका व्यक्तीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. या व्यक्तीचे नाव शोभित पांडे आहे. त्यानंतर शोभित पांडेने सोशल मीडियावर पोस्ट करत आपण गुटखा नाही, तर गोड सुपारी खात होतो, असे स्पष्ट केले आहे. गुटखा खाणे चुकीचे आहे, असाही मेसेज शोभितने दिला आहे. तसेच माझ्यासोबत मैदानात माझी बहिण होती, असे तो म्हणाला.
पुढच्या मॅच दरम्यान याच व्यक्तीचा आणखी फोटोज आता व्हायरल होत आहे. त्याने एका पेपरवर ‘गुटखा खाना गलत बात है’ असे लिहिले आहे. आणि याच व्यक्तीचा हा फोटो सध्या प्रचंड इंटरनेटवर व्हायरल होत आहे.
https://twitter.com/MhaskarChief/status/1463829299773857792?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1463829299773857792%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=http%3A%2F%2Fapi-news.dailyhunt.in%2F
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
कानपूरमधील टेस्ट मॅच दरम्यान एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. या व्हिडिओमध्ये एक मनुष्य गुटखा खाताना आणि फोनवर बोलता दिसून येत होता. लोकांनी या व्हिडिओचा प्रचंड मजाक उडवला. बऱ्याच लोकांनी त्याला पब्लिक प्लेसवर केलेल्या वर्तणूकिवर ट्रोल देखील केले. तर हा गुटखा माणसाची आयडेंटिटी समोर आली आहे. शोभित पांडे असे त्याचे नाव आहे.
व्हायरल व्हिडिओ बाबत स्पष्टीकरण देताना तो म्हणतो की, मी गुटखा खात नव्हतो. मी गोड सुपारी खात होतो. आणि माझ्या बिझनेस पार्टनरसोबत फोनवर बोलत होतो. आणि त्याचवेळी नेमका बरोबर हा व्हिडिओ शूट करण्यात आला. त्याच्या ह्या स्पष्टीकरनानंतरही तो गुटखा मॅन म्हणून फेमस झाला आहे.