सोलापूर : येथील इंदिरा गांधी स्टेडियम अतिशय सुंदर व आंतरराष्ट्रीय दर्जाचे झाले असून लवकरच महिलांचे महाराष्ट्र प्रीमिअर लीग क्रिकेट स्पर्धा घेण्यात येणार असल्याची माहिती महिला क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्षा ॲड. कमल सावंत यांनी आज येथे माहिती दिली.
सोलापूर जिल्ह्यातील महिला क्रिकेट खेळाडूंच्या खेळ वाढीसाठी, सोलापूरच्या भारतीय क्रिकेट माजी खेळाडू व सध्याची U/19 व U/23 भारतीय संघाची कोच अनघा देशपांडे हिचा सत्कार, तसेच १५ माजी राष्ट्रीय महिला खेळाडूंचा सत्कार कार्यक्रम पार्क मैदानावर झाला. यावेळी त्या बोलत होत्या.
यावेळी मनोरमा बँकेचे चेअरमन श्रीकांत मोरे, उद्योगपती दत्ता सुरवसे, माहिला क्रिकेट निवड समिती सदस्य मनिषा भट, नगरसेवक नागेश वल्याळ, खजिनदार प्रकाश भुतडा, BCCI लेव्हल दोनचे आंपायर अनिष सहस्रबुध्दे,व महाराष्ट्र राज्य निवड समिती सदस्य रोहीत जाधव, सोलपूर क्रिकेट संघटनेचे सचिव चंद्रकांत रेंबर्सु, राजेंद्र गोटे, के. टी पवार, उदय डोके बच्चूवार उपस्थित होते.
ॲड. कमल सावंत म्हणाल्या, १९७५ ते १९७७ दरम्यान सोलापूरचे दोन ते तीन मुली क्रिकेट खेळण्यासाठी येत होत्या. त्यानंतर त्या येणे बंद झाले. आता सोलापूरचा संघ चांगला तयार झालेला आहे. पुण्याच्या मुलींपेक्षा सोलापूरच्या मुली चांगले खेळत आहेत. तसेच ग्रामीण भागातल्या महिला खेळाडू चांगले खेळाडू तयार होत आहेत. ग्रामीण भागात मैदान व साहित्य नाही तरीसुद्धा मुली जिद्दीने पुढे येत आहेत. क्रिकेट खेळ जीवन आहे क्रिकेट खेळण्याचा बंद झाल्यानंतर आपली मैत्री ही टिकवली पाहिजे आपल्या मैत्रिणीच्या सुख दुःखातही सहभागी झाले पाहिजे. त्यामुळे जीवनातल्या अडचणी सहज दूर होतात.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
चांगले पेरल्यानंतर चांगले पीक उगवते तसेच चांगले खेळाडू तयार झाल्यानंतर एक चांगला संघ तयार होतो त्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न केले पाहिजेत क्रिकेट खेळाडूंसाठी खूप चांगले दिवस येणार आहेत. जुन्या खेळाडूंसाठी क्रिकेट संघटनेने महिन्याला 22 हजार रुपये पेन्शन योजना सुरु केली आहे यापुढे संघटनेतील पदाधिकाऱ्यांना सुद्धा पेन्शन योजना सुरू होईल. ”
श्रीकांत मोरे म्हणाले, जुन्या काळापासून सोलापुरात उत्कृष्ट खेळाडू तयार झाले आहेत. नेहमी मनोरमा परिवार खेळाडूंच्या पाठीशी आहे. चांगल्या खेळाडूंना मनोरमा संस्थेत नोकरी देण्यात येईल. सोलापुरात एसपीएल झाल्यास एक संघ घेण्यास आम्ही तयार आहोत. संघाला प्रायोजक देण्याला ही आम्ही सदैव तयार आहोत.
नागेश वल्याळ म्हणाले, पार्क मैदान लवकरच सरावासाठी देण्यात येणार आहे. त्यामुळे चांगले खेळाडू तयार होतील पार्क स्टेडियम आंतरराष्ट्रीय दर्जाचे झाले असून सामने घेण्यासाठी सोलापूर सदैव तयार आहे. क्रिकेट संघटनेचे सचिव चंद्रकांत रेंबर्सु यानी सूत्रसंचालन केले.
अनघा देशपांडे म्हणाल्या, क्रिकेटचा खेळण्याचा वेग वाढलेला आहे. चांगले खेळाडू तयार होण्यासाठी तीन तास सराव करून चालणार नाही, जास्तीत जास्त सराव करण्याची गरज आहे. विश्वचषकमध्ये भारताचा दोनदा पराभव होण्याचे कारण म्हणजे संघाला विश्रांती मिळाले नाही, त्यामुळे पराभवाला सामोरे जावे लागले.
* सत्कार झालेले महिला माजी राष्ट्रीय खेळाडू
महाराष्ट्र राज्य महीला क्रिकेट निवड समितीचे सदस्या मनीषा कोल्हटकर (भट ), स्वरूपा कदम, सोलापूरच्या रणजी खेळाडू किरण सोनी- मणियार, स्नेहल जाधव, सारिका कदम, वर्षा हक्के, सुनिता गुराखे, माया खंडी, अमृता भट, अस्मिता मोरे, वैशाली बिराजदार, रुतु भोसले यांचा सत्कार झाला.