नवी दिल्ली : काँग्रेस खासदार शशी थरूर यांचा 6 महिला खासदारांसोबतच्या फोटोची चर्चा होत आहे. हा फोटो थरूर यांनीच शेअर केला असून सुप्रिया सुळेही त्यात दिसत आहे. ‘कोण म्हणतं की लोकसभा ही कामासाठी आकर्षक जागा नाही?’ असे थरुर यांनी फोटो सोबत लिहिल्याने टीका होतेय.
लोकसभेचा कामकाज अधिक आकर्षक करण्यासाठी महिला तिथे नाहीत, असे प्रत्युत्तर नेटकऱ्यांनी दिले. दरम्यान, महिलांसोबतचे थरुर यांचे अनेक फोटो व्हायरल होत असतात. काँग्रेस खासदार शशी थरूर कोणत्याना कोणत्या कारणांमुळे सतत चर्चेत असतात. ट्विटरवर शेअर केलेल्या एका सेल्फीमुळे नेटकऱ्यांनी त्यांना चांगलेच ट्रोल केलं आहे.
काँग्रेस खासदार शशी थरूर यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवर बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे, पटियालाच्या खासदार प्रनीत कौर, दक्षिण चेन्नईच्या खासदार थमिझाची थंगापांडियन, जादवपूरच्या खासदार मिमी चक्रवर्ती, बशीरहाटच्या खासदार नुसरत जहाँ आणि करूरच्या खासदार एस जोथिमनी यांच्यासोबत एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोत शशी थरूर सर्व महिला खासदारांसोबत उभे असल्याचे दिसत आहे.
संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी 6 महिला खासदारांसोबत काढलेला थरूर यांचा हा सेल्फी व्हायरल होत आहे. हा सेल्फी शेअर करताना त्यांनी दिलेल्या कॅप्शनमुळे त्यांना ट्रोल व्हावं लागलं.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
सेल्फी शेअर करताना काँग्रेस खासदार शशी थरूर यांनी कॅप्शनमध्ये लिहिलंय, “कोण म्हणतं लोकसभा ही कामासाठी आकर्षक जागा नाही?” या सेल्फीमध्ये काँग्रेसच्या खासदार प्रनीत कौर आणि जोथिमनी, टीएमसीच्या खासदार नुसरत जहाँ आणि मिमी चक्रवर्ती, राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे, द्रमुकच्या खासदार थामिझाची थंगापांडियन दिसत आहेत.
दरम्यान हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी शशी थरुर यांनी शेअर केलेल्या सेल्फीवर नेटकरी संतापल्याचे दिसत आहे. या फोटोवर लोकांनी तीव्र प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत. थरूर यांचं ट्विट शेअर करताना वकील करुणा नंदी म्हणाल्या की, “शशी थरूर यांनी निवडून आलेल्या राजकीय नेत्यांना त्यांच्या दिसण्यापुरते मर्यादित ठेवण्याचा प्रयत्न केला आहे आणि स्वतःला केंद्रस्थानी दाखवले आहे.”
याशिवाय मोनिकाच्या नावाच्या एका ट्विटर युजरने कमेंट करताना म्हटलंय की, ‘मला खात्री आहे की, उत्तराखंडचे मुख्यमंत्री तीरथ रावत यांच्या फाटलेल्या जीन्सच्या वादाप्रमाणे या उघड लैंगिकतेवर डाव्या उदारमतवाद्यांकडून कोणतीही प्रतिक्रिया येणार नाही.’
That's right, women in Lok Sabha are only elected to amp up the glamour quotient. that is exactly why some parties are pushing for women's reservation bill.
Nonsense! https://t.co/YoTq8IxvbJ
— Alisha Rahaman Sarkar (@zohrabai) November 29, 2021
ट्विटर युजर अलिशा रहमान सरकार खोचक प्रतिक्रिया नोंदवताना म्हणतात की, ‘हे बरोबर आहे, ग्लॅमर वाढवण्यासाठी महिला लोकसभेत निवडून येतात. यामुळेच काही पक्ष महिला आरक्षण विधेयकासाठी आग्रही आहेत. मूर्खपणा!’ दुसरीकडे, ‘महिला लोकसभा आकर्षक करण्यासाठी सजावटीच्या वस्तू नाहीत, त्या खासदार आहेत आणि तुम्ही त्यांचा अपमान करत आहात’, असंही एका ट्विटर युजरने म्हटले आहे.