मुंबई : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी सध्या विविध राज्यातील नेत्यांच्या भेटी घेत आहेत. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला सक्षम पर्याय देण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. मुंबई दौऱ्यावर असताना त्यांनी काही कलाकारांशीही चर्चा केली. त्यावर अभिनेत्री ऋचा चढ्ढाने आनंद व्यक्त केला आहे. तसेच आम्ही एका महिला पंतप्रधानासाठी तयार आहोत, असेही ऋचाने म्हटले आहे. दरम्यान भाजप सरकारवर ऋचाने टीका केली आहे.
दरम्यान बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या मुंबईत असताना ममतांना भेटायला नेहमी भाजपविरोधी वक्तव्ये करणारी अभिनेत्री स्वरा भास्कर मुंबईत आली आहे. स्वरा भास्करने ममतांची भेट घेतल्यानंतर त्यांची स्तुतीही केली आहे. यामुळे स्वरा भास्कर तृणमुल काँग्रेस पक्षात प्रवेश करण्याची शक्यता असल्याची चर्चा आहे.
ममता बॅनर्जींनी मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये त्यांनी सिव्हिल सोसायटीमधील सदस्यांशी संवाद साधला. ममता बॅनर्जी यांनी या कलाकारांसोबत संवाद साधला. त्यावेळी त्यांनी आर्यन खानची अटक या प्रकरणावरून भाजप सरकारवर जोरदार टीका केली.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
शाहरुख खानचा विनाकारण राजकीय बळी देण्यात आला, असे मत त्यांनी आर्यन खानच्या प्रकरणात दिले आहे. भाजपाला क्रूर आणि अलोकतांत्रिक पक्ष देखील त्यांनी यावेळी म्हटले आहे. दिग्दर्शक महेश भट्ट यांनादेखील जाणूनबुजून टार्गेट करण्यात आले होते, शाहरुख खानलाही त्रास देण्यात आला होता. जर आपल्याला जिंकायचे असेल तर आपल्याला लढलं पाहिजे. आणि बोललं पाहिजे. म्हणून आम्हाला राजकीय पक्ष म्हणून मार्गदर्शन करा आणि सल्ला द्या असे त्यांनी उपस्थित कलाकारांसोबत बोलताना म्हटले आहे.
विविध क्षेत्रातील मान्यवरांसोबतच चित्रपट सृष्टीमधूनही मोठ्या संख्येनं मान्यवर उपस्थित होते. चित्रपटसृष्टीतील जावेद अख्तर, स्वरा भास्कर, शत्रुघ्न सिन्हा, महेश भट, रिचा चड्डा यांनी यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये पार पडलेल्या कार्यक्रमासाठी उपस्थिती दर्शविली. या कार्यक्रमादरम्यान बॉलीवूड अभिनेत्री स्वरा भास्कर आणि रिचा चड्डा यांनी केलेल्या वक्तव्याची चर्चा रंगली आहे.
या कार्यक्रमा दरम्यान ममता बॅनर्जी यांनी महाराष्ट्रातील लेखक, विचारवंत, पत्रकार, कलाकार, बुद्धिजीवी अशा लोकांसोबत संवाद साधला. या कार्यक्रमाला ज्येष्ठ गीतकार जावेद अख्तर, अभिनेत्री स्वरा भास्कर, अभिनेत्री रिचा चढ्ढा, पत्रकार राजू परुळेकर, लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर, स्टँड अप कॉमेडियन मुनव्वर फारुकी अशी अनेक मंडळी उपस्थित होती. मुंबई येथील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये हा कार्यक्रम पार पडला.