मुंबई : दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताने पहिल्या दिवसअखेर 4 गडी गमावत 221 धावा केल्या. भारताकडून मयंक अग्रवालने नाबाद 120 धावा केल्या. तर शुबमन गिलने 44, पुजारा 0, विराट 0, अय्यर 18 धावांवर बाद झाले. तसेच न्यूझीलंडकडून अजाज पटेलने 4 विकेट घेतल्या.
देशाची आर्थिक राजधानी असणाऱ्या मुंबईच्या ऐतिहासिक वानखेडे मैदानावर तब्बल पाच वर्षांनंतर आज कसोटी सामना तोही प्रेक्षकांच्या उपस्थितीत सुरु झाला,तेंव्हा बहुतांश स्टॅण्ड प्रेक्षकांनी भरलेले दिसले.
दुखापतीमुळे पहिल्या कसोटीबाहेर असणारा विराट कोहली आज संघात परत आला,तो पहिल्या कसोटीत नेतृत्व करून सामना अनिर्णित ठेवणाऱ्या अजिंक्य रहाणेच्या जागेवर. रहाणेला नक्की काय दुखापत झाली हे तो,कोहली आणि संघ व्यवस्थापनच जानो,पण त्यामुळे विराट कोणाच्या जागेवर खेळणार या सकाळपर्यंत वाटणाऱ्या यक्षप्रश्नाला सहज उत्तर मिळाले, त्याबरोबरच इशांत शर्मा आणि भारतीय संघातला आजच्या घडीचा सर्वात तंदुरुस्त आणि चपळ खेळाडु असणारा जडेजाही नादुरुस्त आहेत असे जाहीर झाले.
अंतीम क्षणापर्यंत ज्याच्या डोक्यावर टांगती तलवार लटकत होती, त्या मयंक आगरवालचा अंतिम 11 मध्ये खेळण्याचा मार्ग मोकळा झाला आणि दैवाने खुश होवून दिलेल्या या संधीचे शब्दशः त्याने सोने करत आजच्या दिवसावर आपली छाप सोडून सर्व टीकाकारांनी केलेल्या टीकेला आपल्या बॅटने उत्तर दिले.
आता हा योगायोग आहे की तिथंल्या मातीचा गुणधर्म हे तुम्हीच ठरवा,पण मयंक सुद्धा तिथूनच येतोय ज्या राज्यातून भारताचा खराखुरा क्रिकेटचा राजदूत म्हणून जगभर मान मिळवणारा कोच राहुल द्रविड सुद्धा. म्हणूनच टिकेने व्यथित न होता आपल्या उत्तम खेळाने त्याने उत्तर दिले असावे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
तरीही शतक पूर्ण झाल्यावर त्याने केलेला जल्लोष बरेच काही सांगून गेला. विराट कोहलीने आज नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेताना,जयंत यादव,मोहम्मद सिराज यांच्यासह संघांची धुरा सांभाळली.
विश्रांतीनंतर परतलेला भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीला मोठा झटका बसला आहे. विराट कोहली न्यूझीलंडविरुद्धच्या मुंबई कसोटीत शून्यावर बाद झाला आहे. त्याआधी चेतेश्वर पुजाराही शून्यावर तंबूत परतला. तर शुभमन गिलने 44 धावांची खेळी केली. तिघांनाही न्यूझीलंडचा फिरकीपटू एजाज पटेलने बाद केले. दरम्यान भारताच्या 30 ओव्हरमध्ये 3 बाद 80 धावा झाल्या होत्या.
मात्र विराट कोहलीला पायचीत बाद देण्याबाबत सोशल मीडियावर उलट सुलट चर्चा सुरु झाली आहे. विराट कोलहीनेही बाद दिल्यानंतर लगेचच रिव्हि्यू घेतला. तिसऱ्या पंचांनीही बराच वेळी रिप्ले पाहिला कारण चेंडू पहिल्यांदा बॅटला लागला आहे का पॅडला लागला हे स्पष्ट होत नव्हते. अखेर अनेकवेळा रिप्ले पाहिल्यानंतर तिसऱ्या पंचांनी विराट कोहलीला बाद दिले.
आज सकाळचा तब्बल दोन तासाचा खेळ मैदान ओले असल्याने वाया गेला होता,तो काही अंशी दिवसाच्या शेवटी भरून काढण्यात आला,आजही केवळ 70 षटकांचा खेळ झाला,त्यात भारताने चार गडी गमावून 221 धावा केल्या आहेत.आता उद्या सकाळच्या सत्रात आजच्या नाबाद जोडीने आणखी काही धावा जमवल्या तर भारतीय संघाला या कसोटीवर नक्कीच पकड मिळवता येईल तर दुसरीकडे पाहुण्या संघाला सुद्धा लवकरच विकेट्स मिळवून भारतीय संघाला गुंडाळण्याची संधी आहे,यात यशस्वी कोण होणार हे उद्या कळणार आहे.
मालिकेतल्या निर्णायक कसोटी सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने चांगली सुरुवात केली, मात्र नाबाद 80 वरून एकदम तीन बाद 80 अशी बिकट अवस्था झाल्यानंतर आजचा शतकवीर मयंकने आधी श्रेयस अय्यर सोबत तर नंतर वृद्धीमान साहासोबत नाबाद अर्धशतकी भागीदारी नोंदवतांना संघाचा डाव सावरताना आपल्या वैयक्तिक चौथ्या शतकाला गवसणी घातली. अंधुक प्रकाशामुळे आज खेळ थांबवला गेला तेंव्हा भारतीय संघाची धावसंख्या चार बाद 221 अशी मजबूत दिसत होती.