बंगळुरू/ मुंबई : कर्नाटकात आलेल्या दोन परदेशी व्यक्तींना ओमायक्रॉनची बाधा झाली आहे. यामधील पहिला रूग्ण 46 वर्ष तर दुसरा रूग्ण 64 वर्षांचा आहे. या दोन्ही रूग्णांमध्ये ओमिक्रॉनची सौम्य लक्षणं आढळून आल्याची माहिती केंद्रीय मंत्र्यांनी दिली आहे. यापैकी 46 वर्षीय व्यक्तीच्या थेट संपर्कात तिघे जण
आले होते. तर या तिघांच्या संपर्कात आणखी दोघे जण आले होते. या पाचही जणांची 22 आणि 25 नोव्हेंबरला कोरोना चाचणी घेण्यात आली होती. यामध्ये पाचही जणांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे.
दरम्यान, ओमिक्रॉनचा एक विषाणू तब्बल 35 जणांना बाधित करु शकतो, असे प्राथमिक माहिती अभ्यासातून समोर आली आहे.म्हणजे त्याचा संसर्गदर हा अल्फा, डेल्टा आणि मूळ कोरोना विषाणूच्या तुलनेत कितीतरी पटींनी जास्त आहे. ओमिक्रॉन विषाणूची लागण झाल्यास नेमकी कोणती उपचारपद्धती असावी हे अद्याप ठरवण्यात आलेले नाही. त्यावर जागतिक आरोग्य संघटनेकडून अभ्यास सुरु आहे. त्यामुळे खबरदारी घेणे हाच ओमिक्रॉनपासून वाचण्याचा नामी उपाय आहे. बाहेर जाताना मास्क वापरणे, हात निर्जंतूक करणे, सोशल डिस्टन्सिंग पाळणे अशी खबरदारी घेण्याचा सल्ला दिला जात आहे.
दक्षिण आफ्रिकेत आढळलेल्या कोरोनाच्या नव्या व्हेरिएंट ओमिक्रॉनची लागण भारतातल्या दोन रुग्णांना झाली आहे. दोन्ही रुग्ण कर्नाटकातील आहेत. केंद्रीय आरोग्य सहसचिव लव अग्रवाल यांनी ही माहिती दिली आहे. हे परदेशातून आलेले 66 आणि 46 वर्षीय दोन पुरूष आहेत.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
जागतिक आरोग्य संघटनेने हा कोरोनाचा चिंताजनक व्हेरिएंट असल्याचे आधीच घोषित केले आहे. आतापर्यंत जवळपास 29 देशांमध्ये ओमिक्रॉनचा फैलाव झाला आहे. त्यामुळे काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
ओमिक्रॉनच्या धोकादायक अशा देशातून हजार पाचशे नाही तर 2668 जण मुंबईत दाखल झालेत. विशेष म्हणजे यांच्यापैकीच 9 जण आणि त्यांच्या संपर्कातला एक जण कोरोना पॉझिटिव्ह आलेले असून, त्यांचा ओमिक्रॉनचा अहवाल प्रतिक्षेत आहे. त्यामुळेच मुंबईकरांनी आता घरात आणि घराबाहेर पडताना काळजी घेणं गरजेचं आहे. आधीच अवकाळी पावसानं वातावरण डल केलेलं असताना, त्यात आणखी आरोग्याच्या समस्या उदभवणार नाहीत याची काळजी घेणं गरजेचं आहे.
10 नोव्हेंबरपासून आतापर्यंत जिथं कोरोनानं हातपाय पसरलेत अशा 40 देशातून 2868 जण मुंबईत दाखल झालेत. गेल्या 20-25 दिवसात हाय रिस्क देशातून जे लोक दाखल झालेत त्यांचा शोध घेतला जातोय. त्यापैकी 500 जणांचा शोध लागला असून त्यांच्या सर्व चाचण्या केल्या गेल्यात. त्यापैकीच 10 जणांचे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आलेले आहेत. हे 10 जण मुंबई, डोंबिवली, पुणे, पिंपरी चिंचवड, भाईंदर, अशा मोठ्या शहरातले रुग्ण आहेत. त्यांची जिनोम सिक्वेन्सिंग केली जातेय. तसच ओमिक्रॉन आहे की नाही याची माहिती देणारी एस जिन चाचणीही केली जाणार आहे.
* देशात 125 कोटींपेक्षा जास्त लोकांना दिले कोरोना लसीचे डोस
– केंद्र सरकारने गुरुवारी दिलेल्या माहितीनुसार देशात आतापर्यंत (2 डिसेंबर) 125 कोटींपेक्षा जास्त नागरिकांना कोरोना लसीचे डोस देण्यात आले आहेत. गेल्या 24 तासात 69,85,074 नागरिकांनी कोरोना लस घेतली आहे. 49 टक्के प्रौढ लोकसंख्येचे पूर्ण लसीकरण झाले आहे. तर 79.16 कोटी लोकांना आतापर्यंत कोरोना लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे.