मुंबई : गदिमा प्रतिष्ठानच्या वतीने दिला जाणारा प्रतिष्ठीत गदिमा पुरस्कार अभिनेते नाना पाटेकर यांना जाहीर झाला आहे. तर गृहिणी सखी सचिव पुरस्कार हा अभिनेत्री निवेदिता जोशी सराफ यांना देण्यात येणार आहे. गदिमा प्रतिष्ठानचे कार्यकारी विश्वस्त आनंद माडगूळकर यांनी पत्रकार परिषद घेत याबाबतची घोषणा केली.
येत्या मंगळवारी म्हणजेच १४ डिसेंबरला हा पुरस्कार वितरण सोहळा पार पडणार आहे. या पुरस्काराचे स्वरूप २१ हजार रुपये, सन्मानपत्र आणि सन्मानचिन्ह असे आहे. या पुरस्काराबरोबरच गृहिणी सखी सचिव पुरस्कार निवेदिता जोशी-सराफ यांना, चैत्रबन पुरस्कार संगीतकार कौशल इनामदार यांना, तर स्व. विद्या माडगूळकर यांच्या समरणार्थ दिला जाणारा विद्या प्रज्ञा पुरस्कार नवोदित गायिका रश्मी मोघे याना प्रदान करण्यात येणार आहे. या बरोबरच शालांत परीक्षेत मराठी विषयात सर्वाधिक गुण प्राप्त १३ विध्यार्थ्यांना प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.
गदि माडगुळकर म्हणजेच मदिमा प्रतिष्ठानच्या वतीने दिला जाणारा प्रतिष्ठीत गदिमा पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांना जाहीर करण्यात आला आहे. गदिमा प्रतिष्ठानचे कार्यक्रारी विश्वस्त आनंद माडगूळकर यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
अभिनेते नाना पाटेकर गेल्या अनेक वर्षांनी चित्रपटसृष्टीसह नाम फाउंडेशनच्या मदतीने राज्यातील अनेक दुष्काळगस्त्र गावांना मदत करत आहेत. अनेक गावे त्यांनी दत्तक देखील घेतली आहेत. नाना पाटेकर यांना घोषित करण्यात आलेल्या गदिमा पुरस्काराचे वितरण येत्या १४ डिसेंबरला पुण्याच्या यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात होणार आहे. या पुरस्काराचे स्वरुप २१ हजार रुपये सन्मानपत्र आणि सन्मानचिन्ह असे असणार आहे.
त्याचप्रमाणे गदिमा प्रतिष्ठानाकडून देण्यात येणारा गृहणी सखी सचिव पुरस्कार हा अभिनेत्री निवेदिता जोशी सराफ यांना देण्यात आला आहे. तर गदिमा चैत्रबन पुरस्कार हा ज्येष्ठ संगीतकार कौशल इनामदार यांना देण्यात आला आहे. तसेच स्व. विद्या माडगूळकर यांच्या स्मरणार्थ देण्यात येणारा विद्या प्रज्ञा पुरस्कार गायिका रश्मी मोघे यांना देण्यात आला आहे.
या सर्व मान्यवरांचा १४ डिसेंबर रोजी पुरस्कार देऊन गौरव करण्यात येणार आहे. पुरस्काराचे वितरण महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. यावेळी गदिमांचे कनिष्ठ बंधू स्व.अंबादास माडगूळकर यांच्या स्मरणार्थ नवोदित गायिका रश्मी मोघे माझी आवडती गदिमा गीते सादर करण्यात आहे. रश्मी ही सूर नवा ध्यास नवा या कार्यक्रमातून आपल्या उत्कृष्ट गायनाने प्रेक्षकांपर्यंत पोहचली. कार्यक्रमात टॉप पाच स्पर्धकांमध्ये रश्मी होती.