उस्मानाबाद : राज्यात एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरूच आहे. त्यातच उस्मानाबाद येथे धक्कादायक प्रकार घडला. येथे आजपासून 8 बसने प्रवासी वाहतूक सुरु करण्यात आली. मात्र यापैकी 2 एसटी बस अज्ञात लोकांनी फोडल्या. उस्मानाबाद ते पुणे बस कौडगाव येथे फोडली तर दुसरी एक एसटी बस उस्मानाबाद ते उमरगा बस चौरस्ता येथे फोडली. पोलिस बंदोबस्तात ही प्रवासी वाहतूक सुरु करण्यात आली होती.
पगारवाढीच्या निर्णयानंतरही विलीनीकरणाच्या मागणीसाठी एस टी महामंडळाचे कर्मचारी संपावर ठाम आहेत. संप दिवसेंदिवस चिघळत आहे. आज उस्मानाबाद जिल्ह्यात पोलीस बंदोबस्तानंतरही दोन बसवर दगडफेक करण्यात आली. कर्मचाऱ्यांचे आंदोलन अद्याप सूरूच आहे.
परिवहन मंत्री अनिल परब यांनी आंदोलन मागे घेण्याचे आवाहन करून सुद्धा कर्मचाऱ्यांनी आंदोलन सूरूच ठेवले होते. त्यातच राज्य सरकारने पोलिस बंदोबस्तात बस सोडण्याचे आदेश दिले होते. मात्र तरीही एसटीवर दगडफेकीच्या घटना सूरू आहेत. आज उस्मानाबादमध्ये पोलीस बंदोबस्तात निघालेल्या दोन एसटीवर दगडफेकीची घटना झाली.
गेल्या जिल्ह्यातील महिन्याभरापासून एसटी सेवा ठप्प आहे. ही बस सेवा सुरू करण्यासाठी प्रशासन प्रयत्न करीत आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
याच अनुषंगाने आज उस्मानाबाद आगारातून पोलीस बंदोबस्तात अकरा बस सुरू करण्यात आल्या आहेत. यापैकी उस्मानाबाद उमरगा ही बस उमरगा येथून परतत असताना उमरगा शहराबाहेरील चौरस्ता येथे दगडफेक करण्यात आली आहे. तसेच उस्मानाबाद- पुणे या बसवर कौडगावजवळ दगडफेक करण्यात आलीय.
याबाबत एस टी प्रशासनाकडून अज्ञातांविरोधात संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बसवर दगडफेक झाली असली तरीही बस सेवा सुरूच ठेवणार असल्याची माहिती विभाग नियंत्रक अमृता ताम्हणकर यांनी दिली आहे. जिल्ह्यात 2766 पैकी 374 कर्मचारी कामावर हजर झाले आहेत. यामध्ये 18 चालक व 18 वाहकांचा समावेश आहे, या कर्मचाऱ्यांच्या मदतीने वाहतूक व्यवस्था करण्यात येणार आहे.
कामावर परतलेल्या कर्मचाऱ्यांमुळे अनेक ठिकाणी बस सोडल्या जात असून, आज सकाळी उस्मानाबाद आगारातून पोलीस बंदोबस्तात बस सेवा सुरू करण्यात आली. मात्र, दोन बसेसवर दगडफेक करण्यात आल्याची अप्रिय घटना घडली आहे. उस्मानाबाद-उमरगा ही बस उमरगा येथून परत निघाली होती. उमरगा शहराबाहेरील चौरस्ता येथे बसला लक्ष्य करत दगडफेक करण्यात आली.
दुसऱ्या घटनेत उस्मानाबाद – पुणे बसवर दगडफेक करण्यात आली आहे. उस्मानाबाद-पुणे बसवर कौडगाव येथे अज्ञातांना बसवर दगडफेक करण्यात आली. या प्रकरणी एसटी प्रशासनाने दिलेल्या तक्रारीवरून अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.