नवी दिल्ली : भारताचे सीडीएस बिपीन रावत आणि त्यांच्या पत्नी मधुलिका यांच्या पार्थिवावर आज दिल्लीत अंत्यसंस्कार करण्यात आले आहे. कन्येने मुखाग्नी दिला. अन् देशाचा श्वास थांबला… हजारो डोळ्यांतून अश्रू ओघळले… एका पर्वाचा अस्त झाला. 17 तोफांची सलामी देण्यात आली
यावेळी देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यासह लष्कराच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी श्रद्धांजली वाहिली. रावत यांना अखेरचा निरोप देताना सर्वांच्या डोळ्यात अश्रू होते. तामिळनाडूत बुधवारी हेलिकॉप्टर कोसळल्याने रावत यांच्यासह त्यांची पत्नी आणि इतर 11 लष्करी अधिकाऱ्यांचा मृत्यू झाला.
बिपीन रावत आणि त्यांच्या पत्नी मधुलिका रावत यांचं पार्थिव एक फुलांनी सजवलेल्या ट्रकमध्ये ठेवण्यात आलं होत. त्यानंतर त्यांची अंत्ययात्रा निघाली. यावेळी दिल्लीकर या अंत्ययात्रेत सामिल झाले होते. तिन्ही सैन्य दलाचे अधिकारी या अंत्ययात्रेत सहभागी झाले होते.
आज शुक्रवारी सकाळी 11 वाजल्यापासून जनरल रावत आणि त्यांच्या पत्नीचा पार्थिव देह अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले. दिल्ली कॅन्टॉन्टमेंटमध्ये ब्रार स्क्वायर स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार झाले. तामिळनाडूतील एका सैनिकी शाळेत नियोजित कार्यक्रमास जाताना सीडीएस बिपीन रावत यांच्या हेलीकॉप्टरचा अपघात झाला. या अपघातामध्ये एकूण १४ जण प्रवास करत होते त्यातील १३ जणांचा मृत्यू झाला आहे.
Delhi: Defence Minister Rajnath Singh pays tribute to #CDSGeneralBipinRawat. pic.twitter.com/1a02c6COaU
— ANI (@ANI) December 10, 2021
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
लोक हातात तिरंगा घेऊन ट्रकच्या मागे पळताना दिसत होते. यावेळी अमर रहे… अमर रहे… जनरल… जनरल अमर रहे, वंदे मातरम… भारत माता की जय… जब तक सूरज चांद रहेगा, बिपीनजी का नाम रहेगा… बिपीनजी अमर रहे…. अमर रहे, अमर रहे….च्या घोषणा दिल्या जात होत्या. अबालवृद्ध आणि तरुणही या अंत्ययात्रेत सामिल झाले होते.
घोषणा देत आज देशाच्या अस्सल हिरोला दिल्लीच्या ब्रार स्क्वायर स्मशानभूमीत अखेरचा निरोप देण्यात आला. त्यांची पत्नी मधुलिका रावत यांच्या पार्थिवावरही याच स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. जनरल बिपीन रावत यांच्या पार्थिवाला त्यांच्या कन्येने मुखाग्नी दिला.
आज सायंकाळच्या सुमारास बिपीन रावत आणि त्यांच्या पत्नी मधुलिका रावत यांच्या पार्थिवावर दिल्लीच्या ब्रार स्क्वायर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आला. रावत यांची अंत्ययात्रा स्मशानभूमीत आल्यावर त्यांना 17 तोफांची सलामी देण्यात आली. त्यानंतर मंत्रोच्चारात लष्करी इतमामात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांची मोठी मुलगी कृतिका हिने आपल्या मात्यापित्यांना मुखाग्नी दिला. कृतिका यांनी रावत आणि मधुलिका रावत यांच्या पार्थिवाला मुखाग्नी देताच अनेकांना अश्रू अनावर झाले होते.
सीडीएस बिपीन रावत यांच्या अंत्यसंस्कारासाठी हजारो लोक जमले होते. दिल्ली आणि आजपासच्या राज्यातूनही लोक आले होते. तसेच श्रीलंका, भूतान, नेपाळ आणि बांगलादेशातील सैन्याचे कमांडरही या वीर योद्ध्याला अखेरची सलामी देण्यासाठी आले होते. स्वत: देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह हे रावत यांच्या अंत्ययात्रेत सामिल झाले होते.