जयपूर : देशासाठी मोठी गुडन्यूज आहे. ती म्हणजे राजस्थानमधील जयपूरमध्ये सापडलेले ओमायक्रॉनचे 9 रूग्ण बरे झाले आहेत. या सर्व रूग्णांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. राजस्थानच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, सर्व रुग्णांना आरयूएचएस रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. यासोबतच त्यांना सात दिवस विलगीकरणामध्ये राहण्यासाठी सांगण्यात आलं आहे.
5 डिसेंबर रोजी जयपूरमध्ये नऊ जणांना कोरोना विषाणूच्या ‘ओमायक्रॉन’ या नवीन प्रकाराची लागण झाल्याचं निष्पन्न झालं. यापैकी चार जण दक्षिण आफ्रिकेतून परतले होते आणि पाचजण त्यांच्या संपर्कात आलेले नातेवाईक होते.
ओमायक्रॉन व्हेरियंटचा पहिला रुग्ण 2 डिसेंबरला कर्नाटकात सापडला होता. देशात आतापर्यंत ओमायक्रॉनचे 23 रुग्ण सापडले आहेत. महाराष्ट्रात ओमायक्रॉन बाधितांची संख्या सर्वाधिक 10 आहे. जागतिक स्तरावर, ओमायक्रॉन व्हेरियंटचे 2, 303 रुग्ण सापडले आहेत.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
अधिकाऱ्यांनी सांगितले की, ”दक्षिण आफ्रिकेतून परतलेल्या कुटुंबासह त्यांच्या संपर्कात आलेल्या 34 लोकांचे नमुने घेण्यात आले, त्यापैकी नऊ जणांना ओमाक्रॉनची लागण झाली, तर 25 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले होते.” ओमायक्रॉन व्हेरियंटचा पहिला रुग्ण 2 डिसेंबरला कर्नाटकात सापडला होता.
देशात आतापर्यंत ओमायक्रॉनचे 23 रुग्ण सापडले आहेत. महाराष्ट्रात ओमायक्रॉन बाधितांची संख्या सर्वाधिक 10 आहे. जागतिक स्तरावर, ओमायक्रॉन व्हेरियंटचे 2, 303 रुग्ण सापडले आहेत.
राष्ट्रव्यापी लसीकरण मोहीमेंतर्गत आतापर्यंत कोरोना प्रतिबंधक लसींचे 131 कोटींहून अधिक डोस देण्यात आले आहेत. काल (गुरुवारी) 74 लाख 57 हजार 970 डोस देण्यात आले आहेत. त्यानंतर आतापर्यंत लसीचे 131 कोटी 18 लाख 87 हजार 257 डोस देण्यात आले आहेत.
राज्यात काल (गुरुवारी) 789 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 585 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत 66 लाख 41 हजार 677 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.72 टक्के आहे. काल एकाही ओमायक्रॉन रुग्णाची राज्यात नोंद झाले आहे. राज्यात सध्या 10 ओमायक्रॉन रुग्णांवर उपचार सुरू आहेत