नवी दिल्ली : ग्रुप कॅप्टन वरूण सिंह यांचं निधन झालं आहे. इंडियन एअरफोर्सने ट्विट करत याची माहिती दिली. तामिळनाडू येथील हेलिकॉप्टर दुर्घटनेतून बचावलेले ते एकमेव अधिकारी होते. त्यांच्यावर बंगळुरू येथील रूग्णालयात उपचार सुरू होते. परंतु आज त्यांचे निधन झाले. त्यांच्या निधनावर पंतप्रधान मोदी यांच्यासह अनेकांनी शोक व्यक्त केला.
बंगळुरुतील रुग्णालयात आठवड्याभराच्या उपचारांनंतर त्यांची प्राणज्योत मालवली. 8 डिसेंबरला तामिळनाडूमध्ये झालेल्या हेलिकॉप्टर अपघातात जनरल बिपीन रावत, त्यांची पत्नी मधुलिका रावत आणि 11 लष्करी अधिकाऱ्यांना प्राण गमवावे लागले होते. वरुण सिंह यांच्या निधनाने अतीव दुःख झाल्याच्या भावना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरवरुन व्यक्त केल्या आहेत.
अल्पावधीतच त्यांच्यावर तीन शस्त्रक्रिया झाल्या होत्या. प्रकृती चिंताजनक असल्यानेच त्यांना एअरलिफ्ट करून बंगळुरू येथे आणण्यात आले होते. पण उपचारादरम्यान त्यांच्याकडून फारसा चांगला प्रतिसाद मिळत नव्हता. हेलिकॉप्टर दुर्घटनेत वरूण सिंह हे मोठ्या प्रमाणात जखमी झाले होते.
त्यांच्यासोबतचे सीडीएस बिपीन रावत आणखी १३ जणांनी या दुर्घटनेत आपले प्राण गमावले होते. वरूण सिंह यांची गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेली मृत्यूची झुंज अखेर अपयशी ठरली. एएनआय या वृत्तसंस्थेने ही माहिती जाहीर केली आहे. बंगळुरूच्या कमांड हॉस्पिटलमध्ये त्यांचा मृत्यू झाल्याचे वृत्त एएनआय या वृत्तसंस्थेने दिले आहे.
Group Captain Varun Singh, the lone survivor of #TamilNaduChopperCrash – who was under treatment at Command Hospital in Bengaluru – passes away at the hospital. pic.twitter.com/l8XsiihL5k
— ANI (@ANI) December 15, 2021
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
जयजयकारच्या गगनभेदी घोषणांच्या पार्श्वभूमीवर जनरल बिपीन रावत यांना दिल्लीच्या ब्रार स्क्वायर स्मशानभूमीत 10 डिसेंबरला अखेरचा निरोप देण्यात आला. त्यांची पत्नी मधुलिका रावत यांच्या पार्थिवावरही याच स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. जनरल बिपीन रावत यांच्या पार्थिवाला त्यांच्या कन्येने मुखाग्नी दिला.
हेलिकॉप्टर अपघाताआधी पायलटने कोणताही मे डे कॉल केला नव्हता. मे डे कॉल हा इमर्जन्सीवेळी कंट्रोल रुमल केला जातो. कोणताही तांत्रिक बिघाड किंवा संकट ओढावलं तर क्रू मेंबर कंट्रोलरुमला संपर्क करतात. आणि तीन वेळा मे डे असा शब्द उच्चारतात. मात्र या अपघातावेळी क्रू मेंबर्सकडून कोणताही मे डे कॉल आला नसल्याची माहिती आहे.
जिथं अपघात घडला. त्या कुन्नूर भागात सैन्याची छावणी आहे. इथल्याच एका कार्यक्रमात बिपीन रावत हजर राहणार होते. विशेष म्हणजे अपघातस्थळापासून लँडीगचं ठिकाण फक्त पाच मिनिटांच्या अंतरावर होतं. त्यामुळे अपघाताआधी हेलिकॉप्टर लँडिंगच्या तयारीत असल्याचीही प्राथमिक माहिती आहे.