मुंबई : रिलायन्स जिओने आपला सर्वात स्वस्त रिचार्ज प्लान लॉन्च केला आहे. हा प्लॅन फक्त 1 रूपयांचा आहे. हा प्लॅन My Jio ॲपवर लॉंच करण्यात आला आहे. इतर कोणतीही टेलिकॉम कंपनी सध्या इतका स्वस्त प्लॅन आपल्या ग्राहकांना ऑफर करत नाही.
सध्याच्या परिस्थितीत एक रुपयाचा प्लॅन भारतातील सर्वात स्वस्त रिचार्ज प्लॅन झाला आहे. जिओशिवाय व्होडाफोन-आयडिया, एअरटेल, बीएसएनएल आणि एमटीएनएलकडून एक रुपयाचा रिचार्ज प्लॅन दिला जात आहे.
भारतात गरिब नागरिकांची मोठी लोकसंख्या आहे. त्यांचा इंटरनेटचा वापर खूपच मर्यादित आहे. अशा गरजू ग्राहकांसाठी जिओकडून एक रुपयाच्या किमतीचा डेटा प्लॅन सादर करण्यात आला आहे. जिओतर्फे एक रुपयाच्या प्लॅनशिवाय 10 आणि 20 रुपयांमध्ये टॉप-अप प्लॅन मिळतात. 10 रुपयांच्या प्लॅनमध्ये 7.47 रुपयांचा टॉक टाइम मिळतो. तर 20 रुपयांच्या प्लॅनमध्ये अनलिमिटेड व्हॅलिडिटीसह 14.95 रुपयांचा टॉकटाइम मिळतो आहे.
या प्लॅनमध्ये 30 दिवसांची वैधता उपलब्ध आहे. Jio कडून ग्राहकांना एक रुपयाच्या प्लॅनमध्ये 100 MB हायस्पीड डेटा दिला जात आहे. या प्लॅनमध्ये कॉलिंग आणि मेसेजिंग सुविधा दिलेली नाही. सिम सक्रिय ठेवण्यासाठी हा प्लॅन खूप उपयुक्त ठरू शकतो.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
वेबसाइटर सध्या हा पॅक लिस्ट करण्यात आलेला नाही. हा पॅक वॅल्यू सेक्शनमध्ये पाहता येईल. वॅल्यू सेक्शनच्या Other Plan मध्ये हा 1 रुपयांचा प्लॅन लिस्ट करण्यात आला आहे. Other Plans मध्ये Reliance Jio चा नवा 1 रुपयांचा प्लॅन दिसेल.
1 रुपयाचा प्रीपेड प्लॅन 100 MB डेटासह येतो. या प्लॅनची वॅलिडिटी 30 दिवसांची आहे. याला दहा वेळा रिचार्ज केल्यानंतर जवळपास 1GB डेटा मिळेल. म्हणजेच तुम्ही केवळ 10 रुपयांत 30 दिवसांसाठी 1 GB डेटाचा फायदा घेऊ शकता. हा प्लॅन कंपनीच्या 15 रुपयांच्या 1GB 4G डेटा व्हाउचरपेक्षा परवडणारा आहे.
Jio चा 1 रुपयांचा प्रीपेड प्लॅन देशभरात सर्वात स्वस्त प्रीपेड प्लॅन आहे. 100MB डेटा ग्राहकांना 30 दिवसांसाठी दिला जातो. जर एखाद्याला 400MB डेटाची गरज असेल, तर ते या प्लॅनद्वारे चार वेळा रिचार्ज करू शकतात. यामुळे अधिक डेटा असणारा पॅक घेण्याची गरज लागणार नाही.