पुणे : एमपीएससी स्पर्धा परीक्षेचा विद्यार्थी स्वप्नील लोणकरने २९ जून रोजी पुण्यातील फुरसुंगी येथे आत्महत्या केली. तो अथक परिश्रम घेऊन एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण होऊन दीड वर्षे झाले तरी त्याला लोकसेवा आयोगाने नियुक्ती दिली नसल्याने नैराश्यातून त्याने आत्महत्या केली. आता, स्वप्नीलची जी मुलाखत गेल्या दीड वर्षापासून झालेली नव्हती, त्या मुलाखतीच्या यादीमध्ये स्वप्नील लोणकर हे नाव झळकलं आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएसी) परीक्षेत उत्तीर्ण होऊनही नोकरी नसल्याच्या तणावातून स्वप्निल लोणकर या विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली होती. स्वप्निलची आत्महत्त्या मुलाखत होत नसल्याच्या प्रश्नाबाबत चर्चेचं कारण ठरली होती.
स्वप्नील एमपीएससीच्या २०१९ च्या पूर्व व मुख्य परीक्षेत उत्तीर्ण झाला होता. मात्र, त्याची मुलाखत दीड वर्षांपासून झाली नव्हती. त्याचबरोबर त्याने २०२० मध्येही एमपीएससीची परीक्षा दिली. त्यामध्ये पूर्व परीक्षा तो उत्तीर्ण झाला. मात्र, करोनामुळे मुख्य परीक्षा झाली नव्हती. या तणावातून आत्महत्या केल्याचे त्याने मृत्युपुर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत लिहिले होतं. मात्र आती जी मुलाखत दीड वर्षापासून झालेली नव्हती, त्याच मुलाखतीच्या यादीमध्ये आता स्वप्नील लोणकरचं नाव आलं आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. त्यामध्ये, दुसऱ्या क्रमांकावर स्वप्नील लोणकरचे नाव असून ७ जानेवारी रोजी सकाळी ८ वाजता स्वप्नीलला मुलाखतीसाठी बोलविण्यात आलं आहे. स्वप्नीलचं हे नाव पाहून अनेकांनी दु:ख व्यक्त केलं आहे. तर, पुण्यातील स्वप्नीलच्या मित्रांनाही अश्रू अनावर झाले. आता तो कसा हजर राहणार, हाच सवाल विचारला जात होता.
मुलाखत रखडल्याने स्वप्नील लोणकरने आत्महत्या केली होती. आता मृत्यूनंतर एमपीएसीने मुलाखती यादी जाहीर केली असून या यादीत स्वप्नील लोणकरचं नाव आहे. सात जानेवारीला एमपीएसी परीक्षा पास झालेल्या उमेदवारांच्या मुलाखती होणार आहेत. आत्महत्या केलेल्या स्वप्नील लोणकर याचं नाव यादीत वगळण्यात आलेलं नाही. यानिमित्ताने एमपीएसीचाचा भोंगळ कारभार उघड झाला आहे. यावरुन आता विरोधकांकडूनही सरकावर टीका करण्यात येत आहे.
स्वप्निल लोणकर आत्महत्या प्रकरणाचे पडसाद पावसाळी अधिवेशनातही पाहायला मिळाले होते. भाजपच्या आमदारांनी जोरदार घोषणाबाजी करत सभागृह दणाणून सोडले. तर, देवेंद्र फडणवीस यांनीही MPSC परीक्षेच्या मुद्यावरून ठाकरे सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला. फडणवीसांनी स्वप्निल लोणकरची सुसाईड नोटच सभागृहात वाचून दाखवली होती.