सोलापूर : खेलो इंडिया राज्य खो खो स्पर्धेत लातूर विभागाचे प्रतिनिधित्व करत असलेल्या उस्मानाबाद जिल्ह्याच्या मुली संघाने अंतिम फेरीत पुणे विभागाचा ८ गुणांनी पराभव करीत विजेतेपद पटकाविले.
शिवछत्रपती क्रीडा संकुल, बालेवाडी (पुणे) येथे झालेल्या पहिल्या सामन्यात लातूर विभागाने औरंगाबाद विभागाचा डावाच्या फरकाने पराभव केला. दुसऱ्या सामन्यात कोल्हापूर विभागाबरोबर १ गुण व ४.३० मिनिटे राखून जिंकून अंतिम फेरीत प्रवेश केला. वरील सर्व विजयी खेळाडू व प्रशिक्षक यांचे डॉ. चंद्रजीत जाधव, जिल्हा संघटनेचे अध्यक्ष अनिल खोचरे, अभय इंगळे, जिल्हा क्रीडा अधिकारी भाग्यश्री बिले यांनी अभिनंदन केले.
विजयी संघातील खेळाडू : वैभवी गायकवाड (कर्णधार), संपदा मोरे, जान्हवी पेठे, अश्विनी शिंदे, गौरी शिंदे, अमृता जगताप, नम्रता गाडे, किरण शिंदे, श्वेता राऊत, आदिती गवळी, ऋतुजा व्हरकाटे, स्नेहा पवार. प्रशिक्षक : प्रविण बागल.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
* पुण्याचे सुयश गरगटे व प्रियांका इंगळे महाराष्ट्र खो-खो संघाचे कर्णधार
वेळापूरचा राहुल सावंत संघात, सतीश कदम व्यवस्थापक
सोलापूर : पुण्याचे सुयश गरगटे व प्रियांका इंगळे यांची महाराष्ट्र पुरुष व महिला खो खो संघाच्या कर्णधारपदी निवड झाली. संघात वेळापूरच्या राहुल सावंत यांचा समावेश आहे. तसेच सतीश कदम यांची पुरुष संघाच्या व्यवस्थापकपदी निवड झाली.
वेळापूर ( जि. सोलापूर) येथे झालेल्या वरिष्ठ गट राज्य अजिंक्यपद स्पर्धेतून निवड समिती सदस्य नामदेव गोमारे (लातूर), महेंद्र गाढवे ( सातारा), कमलाकर कोळी (ठाणे) आणि नेहा तपस्वी (पुणे) यांनी निवडलेले संघ महाराष्ट्र खो खो संघटनेचे सरचिटणीस गोविंद शर्मा यांनी जाहीर केले.
संघास भारतीय खोखो महासंघाचे सहसचिव डॉ. चंद्रजीत जाधव, महाराष्ट्र खो-खो संघटनेचे अध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर, उपाध्यक्ष महेश गादेकर, सरचिटणीस गोविंद शर्मा, कार्याध्यक्ष सचिन गोडबोले व खजिनदार अरुण देशमुख यांनी शुभेच्छा दिल्या. जबलपूर, मध्य प्रदेश येथे २६ ते ३० डिसेंबर या कालावधीत होणाऱ्या ५४ व्या पुरुष व महिला राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेत हे संघ सहभागी होतील. या संघाचे सराव शिबिर कुळगाव (जि. ठाणे) येथे सुरू झाले.
संघ असे : पुरुष : सुयश विश्वास गरगटे (कर्णधार), प्रतिक किरण वाईकर, मिलिंद राजेंद्र कुरपे, सागर सुभाष लेंगरे (पुणे)ऋषिकेश विजय मुर्चावडे, अक्षय संदीप भांगरे, अनिकेत भगवान पोटे, हर्षद विजय हातणकर (मु.उपनगर), अरुण आनंदा गुणकी,सुरज शितल लांडे (सांगली),गजानन मारुती शेगाळ (ठाणे), राहुल भारत सावंत (सोलापूर), राखीव : लक्ष्मण अर्जुन गवस (ठाणे), अभिषेक बाळासाहेब पवार (अ.नगर), श्रेयस सुधाकर राउळ (मुंबई), प्रशिक्षक : बिपीन पाटील (मुंबई), व्यवस्थापक : सतीश कदम (सोलापूर).
महिला : प्रियांका हनुमंत इंगळे (कर्णधार), दिपाली अर्जुन राठोड, श्वेता अशोक वाघ, स्नेहल अंकुश जाधव (पुणे), रुपाली सुर्यकांत बडे, रिश्मा सुभाष राठोड, पूजा दादासाहेब फरगडे (ठाणे), गोरी राजेश शिंदे,अश्विनी आप्पासाहेब शिंदे, जान्हवी विजयकुमार पेठे (उस्मानाबाद), अपेक्षा अनिल सुतार, आरती अनंत कांबळे (रत्नागिरी), राखीव : अंकिता सावकार लोहार (सांगली), पायल सुधीर पवार (रत्नागिरी), संध्या सौदागर सुरवसे (सोलापूर), प्रशिक्षक : महेश पालांडे (ठाणे), व्यवस्थापिका : नेहा तपस्वी (पुणे).