भंडारकवठे (नितिन वारे ) : दक्षिण सोलापूर तालुक्यातील भंडारकवठे येथील रहिवासी व कुसूर येथे जिल्हा परिषद मुख्याध्यापक म्हणून रुजू असलेले निलेश नंदर्गी यांनी आपली स्वकमाईने बँकेत ठेवलेली १ लाख रुपये असलेली ठेव मोडून कुसूरच्या जिल्हा परिषद शाळेच्या रंगरंगोटी व शाळा सुधारणा करण्यासाठी दिली आहे.
आज जग एकविसाव्या शतकाकडे जात असताना शिक्षणाचा दर्जा घसरत चालला आहे. मात्र याउलट पालकांना सुध्दा हेवा वाटावा असा एक मुख्याध्यापक भंडारकवठे येथे पाहावयास मिळत आहे. यांचे कौतुक होत आहे. विद्येच्या मंदिरासाठी त्यांनी आपली कष्टाची पुंजी (ठेव) मोडून दिली आहे. त्यांनी आपलं संसार संभाळून ‘शाळा हे आपलं कुटुंब’ आहे असं समजून काम करत आहेत. भंडारकवठ्याचे व कुसूरचे मुख्याध्यापक निलेश नंदर्गी यांनी मुलगा- नवरा- वडील – शिक्षक व मुख्याध्यापक या भूमिकेतून नवा आदर्श सगळ्याचा डोळ्यांपुढे ठेवला आहे.
भंडारकवठे येथील रहिवासी व कुसुर येथे जिल्हा परिषद मुख्याध्यापक म्हणून रुजू असलेले नीलेश नंदर्गी यांनी कुसूरच्या जिल्हा परिषद शाळेच्या रंगरंगोटी व शाळा सुधारणा करण्यासाठी त्यांनी आपली जिल्हा मध्यवर्ती बँकेत १ लाख रुपये असलेली ठेव मोडून दिली शाळेला दिली आहे.
‘सुराज्य डिजिटल’शी बोलताना मुख्याध्यापक नीलेश नंदर्गी म्हणाले, की आपण गेली ३३ वर्षांपासून शिक्षक म्हणून काम करीत असताना अक्कलकोट, मंद्रूप, तेलगाव, मंगळवेढा इत्यादी ठिकाणी नोकरी केली. घरसंसाराचा गाडा चालवत थोड्या प्रमाणात मुला व मुलींच्या शिक्षणासाठी व विवाहासाठी आर्थिक जुळवाजुळव केली.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
मुलीच्या लग्नासाठी ७ लाख रुपये ठेव ठेवली होती. मुलीचा लग्न हे फक्त ६ लाखात झाले व उर्वरित १ लाख रुपये शिल्लक राहिले होते. १ लाख रुपये सामाजिक कामासाठी वापर व्हावे अशी भावना मनात होती.
अनेक दिवसापासून ही इच्छा मनात होती. माझी एकत्र कुटुंब पद्धती असल्यानेही पत्नी,आई,मुलगा,व भावाची विधवा पत्नी याच्या संमतीने हा निर्णय घेतला. त्याच बरोबर भंडारकवठे येथील ग्रामदैवत शिवयोगी महासिध्द देवालयात दर अमावसेला परगावाचे दर्शनाला आलेल्या भाविकांना महाप्रसादाचे आयोजनही केलं जातं. या वेळी असंख्य भाविक महाप्रसादाचा लाभ घेतात, अशी अनेक सामाजिक कार्य मी माझे जीवन असेपर्यंत करत राहणार यात माझ्या पत्नीचा व माझ्या संपूर्ण कुटुंबाचा सिंहासा वाटा असल्याचेही सांगितलं.
अनेक तालुक्यात काम करत असताना गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना शालेय जीवनात आलेल्या अडीअडचणी सोडविण्याचा प्रयत्न केला आहे. माझे आदर्श कै. दीनानाथ कमळे गुरुजी यांनी मला जी शिकवण दिली तीच शिकवण मी पुढे नेण्याचा प्रयत्न करीत आहे कै. दीनानाथ कमळे गुरुजी यांनी दक्षिण सोलापूर तालुक्यातील आर्थिक दुर्बल व मागास समाजात शिक्षणापासून वंचित राहता कामा नये यासाठी त्यांनी शिक्षण संस्था काढल्या व मोफत शिक्षण दिले, त्याचाच आदर्श डोळ्यासमोर ठेवून काम करत आहे. त्यातूनच ही रक्कम शाळेसाठी देण्याची कल्पना सुचली. निलेश नंदर्गी यांनी केलेले कामाचे कौतूक संपूर्ण तालुक्यात होत आहे.
जिल्हा परिषद शिक्षक नागनाथ कोळी, शिवाजी नकाते, अण्णाराव पाटील, अश्विनी कुलकर्णी, शिवानंद माशाळे, वृध्दयना खडाखडे, शमशादबेगम मुल्ला,मुनीर बारुदवाले, रावसाहेब गिडगोंडे यांनी त्यांच्या कार्याचे कौतुक केले आहे.